भाजपमध्ये इनकमिंगचा धडाका; ठाकरे बंधूंना धक्का, बड्या नेत्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं
Saam TV November 14, 2025 05:45 AM

संघर्ष गांगुर्डे, साम टिव्ही

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपमध्ये प्रवेशाचा सिलसिला अखंड सुरूच आहे. नुकतेच शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे भाजपमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, आता त्यांच्या पाठोपाठ डोंबिवलीतील शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून राजकीय समीकरणे ढवळून काढली आहेत.

मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या प्रवेश सोहळ्याला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत, कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब व माजी स्थायी समिती सभापती दीपेश पुंडलिक म्हात्रे उपस्थित होते. यावेळी डोंबिवलीतील अनेक शिवसेना व मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.

तानाजी सावंत यांच्या भावाचा भाजप प्रवेश रखडला; कौटुंबिक की राजकीय मतभेद? नेमकं कारण काय?

प्रवेश करणाऱ्यांमध्ये प्रमुखत्वाने ओमनाथ नाटेकर (शहरप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे – डोंबिवली पूर्व), सचिन कुर्लेकर (शाखा प्रमुख), हरिश्चंद्र परडकर (शहर संघटक), मिलिंद म्हात्रे (अध्यक्ष, मनसे विद्यार्थी सेना), गणेश यादव (विभाग प्रमुख, मनसे) आणि समीर पाटील (शाखा अध्यक्ष, मनसे) यांचा समावेश आहे. हे सर्व पदाधिकारी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

अजित पवार गटाकडून काँग्रेसला जबरी धक्का; ज्येष्ठ नेत्याचा रामराम, ४० वर्षांची सोडली साथ

या प्रसंगी माजी नगरसेवक पप्पू म्हात्रे, मंदार टावरे, नगरसेवक मंदार हळबे तसेच भाजपचे अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या मोठ्या प्रवेशामुळे डोंबिवली शहरातील भाजपची ताकद आणखी मजबूत झाली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश भाजपसाठी महत्त्वाचा राजकीय टप्पा मानला जात आहे.

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गट अन् राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र, सोलापुरातील राजकारण फिरणार
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.