हिवाळा ऋतू सुरू झाल्याने सर्वत्र थंड वारे वाहत आहेत आणि बाजारांमध्ये पालक, मेथी, मोहरी, चवळीची भाजी आणि कोथिंबीर अशा हिरव्या पालेभाज्या अगदी फ्रेश ताज्या आणि हिरव्यागार विकायला येतात. कारण हिवाळ्यात पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. कारण या पालेभाज्यांचे सेवन केल्याने शरीराला आतून उबदारपणा आणि विविध फायदे प्रदान होतात. तसेच हिवाळ्यात प्रत्येक भारतीय घरांमध्ये पालेभाज्या सामान्यतः आहारात समावेश करतात. ज्यामुळे पोषक तत्वांनी समृद्ध या पालेभाज्या प्रत्येक महिला मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. तर हिवाळ्यात खरेदी केलेल्या या पालेभाज्या जास्त दिवस ताज्या ठेवता येत नाहीत.
तर आपल्यापैकी अनेकजण एकाचवेळी जास्त पालेभाज्या आणून रेफ्रिजरेटरमध्ये किंवा बाहेर स्टोअर करून ठेवतात पण दोन दिवसातच त्या संपवाव्या लागतात. जर वेळीच या पालेभाज्या संपवल्या नाही तर त्या खराब होऊ लागतात आणि आपण त्या फेकून देतो. यामुळे एवढ्या महागमोलाच्या पालेभाज्या फेकून दिल्या तर त्या वायाच जातात. यासाठी हिवाळ्यात आणलेल्या पालेभाज्या फ्रेश आणि दिर्घकाळासाठी फ्रिजमध्ये स्टोअर करायचा असतील तर या काही खास टिप्सचा अवलंब करा. चला तर मग आजच्या लेखात आपण या खास टिप्सबद्दल जाणून घेऊयात.
आपल्यापैकी अनेकजण भाज्या खरेदी केल्यानंतर लगेच धुवून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याची चूक करतात. यामुळे पानांमध्ये ओलावा राहतो, ज्यामुळे त्या लवकर खराब होतात. म्हणून प्रथम पालेभाज्या वर्तमानपत्रावर किंवा सुती कापडावर पसरवा आणि त्यांना 10-15 मिनिटे हवेत सुकू द्या. त्यानंतरच त्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
भाज्या सुकवल्यानंतर त्या कोरड्या सुती कापडात किंवा पेपर टॉवेलमध्ये गुंडाळा. यामुळे जास्त ओलावा निघून जातो आणि भाज्या सुकल्या जात नाही. विशेषतः धणे, पुदिना आणि मेथी ताजे ठेवण्यासाठी हा उपाय प्रभावी आहे.
भाज्या थेट प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये साठवल्याने हवा फिरण्यापासून रोखली जाते आणि त्यात बुरशी निर्माण होऊ शकते. म्हणून पालेभाज्या नेहमी हवाबंद डब्यात किंवा छिद्रे असलेल्या डब्यात ठेवाव्यात. जेणेकरून भाज्या 1-2 दिवस ताज्या राहतील.
प्रत्येक पालेभाज्याची पोत आणि आर्द्रता वेगवेगळी असते. म्हणून, पालक, मोहरी यासारख्या भाज्या एकत्र साठवू नयेत. जर त्या पॉलिथिनच्या पिशव्या किंवा कंटेनरमध्ये वेगळ्या साठवल्या तर त्या जास्त काळ ताज्या राहतील.
रेफ्रिजरेटरच्या तळाशी असलेला क्रिस्पर बॉक्स भाज्यांसाठी सर्वोत्तम जागा आहे. कारण क्रिस्पर बॉक्समध्ये तापमान आणि आर्द्रता संतुलित राखली जातात. ज्यामुळे पालेभाज्या फ्रेश राहतात. या बॉक्समध्ये ठेवलेल्या भाज्या 2 ते 4 दिवस ताज्या राहतात.
कोथिंबीर किंवा पुदिना ताजे ठेवण्याचा आणखी एक प्रभावी मार्ग म्हणजे त्यांना पाण्यात ठेवणे. तर कोथिंबीर आणि पुदिन्याची देठ न कापता, त्यांना पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये ठेवा आणि प्लास्टिकच्या आवरणाने झाकून ठेवा. यामुळे पाने सुकली जात नाही आणि ती 34 दिवसांपर्यंत ताजी राहतात.