Bike Accident: खापावरून गावाकडे जाताना दुचाकी घसरली; दुचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू
esakal November 15, 2025 04:45 PM

खापा : खापा-सिंदेवानी मार्गावर टायगर रिसोर्टजवळील टेंभुरडोह फाट्याजवळ शुक्रवारी (ता.१४) सायंकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात विजय पांडुरंग मोहतकार (वय ३६, रा. नागलवाडी, ता. सावनेर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय मोहतकार हे खाप्यावरून आपल्या गावाकडे दुचाकीने जात असताना अचानक त्यांची बाइक घसरून दगडावर आदळली. अपघात इतका गंभीर होता की विजय रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले आढळले.

दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसली की बाइक अनियंत्रित होऊन अपघात झाला, याबाबतचे नेमके कारण मात्र स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी येताना कोणतीही प्रत्यक्षदर्शी माहिती न मिळाल्याने अपघाताचे कारण अद्यापही रहस्यमयच राहिले आहे.

अपघाताची माहिती मिळताच खापा पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. जखमी विजय मोहतकार यांना हितज्योती आधार फाउंडेशनच्या हितेश बन्सोड यांच्या रुग्णवाहिकेद्वारे सावनेर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात! सात जणांचा जागीच मृत्यू; आठ वाहनांचा चुराडा, महामार्ग ठप्प

मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाचा पुढील तपास खापा पोलिसांनी सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.