देवळा: विंचूर- प्रकाशा (७५२ जी) महामार्गावर शुक्रवारी (ता. १४) साक्री आगाराची नाशिक- नंदुरबार एस. टी. बस भावडे फाट्यानजीक पलटी झाल्याची गंभीर घटना घडली. बसमधील ३६ प्रवाशांपैकी सहा प्रवासी जखमी झाले असून, उर्वरितांना प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नाशिक- नंदुरबार बस (एमएच २० बीएल २६६१) सटाण्याच्या दिशेने जात असताना भावडबारी घाटानंतर रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या भागात महामार्गाचे काँक्रिटीकरण सुरू असून, कटर मशिनने रस्त्याला चिरे पाडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे येथे एकेरी वाहतूक होती. मात्र, ठळक बॅरिकेट्स व दिशादर्शक फलक नसल्याने बसचालकाच्या परिस्थिती लक्षात न आल्याने वेगावर नियंत्रण मिळविताना बस उलटली.
अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. काहींना किरकोळ, तर काहींना गंभीर दुखापती झाल्याने जखमींना देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिस निरीक्षक सार्थक नेहते यांनी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली व पंचनामा केला. देवळा पोलिस ठाण्यात मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी प्रवासी असे
नंदा दिलीप नंदन (वय ६२, रा. ताहाराबाद), उषा किशोर शिंदे (४०, रा. सटाणा), ऋतुजा किशोर शिंदे (१८, रा. सटाणा), निर्मला देवीदास पाडवी (४०, रा. नंदुरबार), किरण सुरेश सोनार (५५, रा. नंदुरबार), शौर्य गोविंदा सोनार (१०, रा. नंदुरबार).
मेशी-धोबीघाट अपघाताची आठवण
बस ज्या ठिकाणी कलंडली, त्या ठिकाणापासून काही अंतरावर एक बांधलेली व एक कठडे नसलेली अशा दोन विहिरी आहेत. बस आणखी काही फूट पुढे गेली असती तर मोठी जीवितहानी झाली असती. त्यामुळे जानेवारी २०२० मध्ये मेशी- धोबीघाटजवळ झालेल्या बस विहिरीत कोसळण्याच्या दुर्घटनेची आठवण सर्वांना झाली.
Nagpur Municipal Corporation: महापालिका प्रभाग रचना हरकतींवर मुंबईत सुनावणी; नागपूर खंडपीठाने दुनेश्वर पेठेंची याचिका केली वर्गकाँक्रिटीकरण मार्गावर काम सुरू असताना ‘काम चालू- वळण रस्ता’ असे ठळक व स्पष्ट दिशादर्शक फलक असणे अत्यावश्यक आहे. पण, येथे तसे फलक नसल्याने बसचालकाला परिस्थिती लक्षात येण्यास उशीर झाला. भविष्यात अशा निष्काळजीपणापासून सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.’’
- डॉ. सुनील आहेर, मुख्याध्यापक