-rat१५p१४.jpg-
२५O०४५२३
रत्नागिरी : बालदिनाचे औचित्य साधून बियाणी बालमंदिरात बालदोस्तांनी बैलगाडीतून सफर केली.
-----
बियाणी बालमंदिर मुलांची बैलगाडी सफर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : भारत शिक्षण मंडळाच्या बियाणी बालमंदिरात बालदिनानिमित्त बालदोस्तांना बैलगाडीतून सफर घडवण्यात आली.
या प्रसंगी प्रमुख अतिथी हरहुन्नरी कलाकार श्रीकांत ढालकर, शालेय समितीचे प्रबंधक विनायक हातखंबकर, कुष्टे, चंद्रकांत घवाळी, कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरचे शिक्षक सुधीर शिंदे यांच्या उपस्थितीत बालमंदिरच्या चिमुकल्यांसमवेत फुगे सोडण्याचा आनंद सर्वांनी घेतला. रंगीबेरंगी फुलांचे मुखवटे घालून मुलांनी बैलगाडीतून सफर केली. सर्वत्र उत्सवाचे व आनंदाचे वातावरण होते. चाचा नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. श्रीकांत ढालकर यांनी विद्यार्थ्यांना पक्षी, प्राणी यांची चित्रे काढून दाखवली. विविध पक्ष्यांचे, प्राण्यांचे आवाज काढून दाखवले. बोलक्या बाहुल्यांचा खेळ दाखवला. मुलांना खाऊ देण्यात आला. कार्यक्रमासाठी नंदिनी देसाई, दीप्ती कानविंदे उपस्थित होत्या. बालमंदिरच्या मुख्याध्यापिका धनश्री मुसळे यांनी नियोजन केले.