आयपीएल 2026 स्पर्धेसाठी फ्रेंचायझींनी कंबर कसली आहे. मागच्या पर्वात केलेल्या चुका दुरूस्त करण्यासाठी मिनी लिलावापू्र्वी संघाची बांधणी सुरु केली आहे. चेन्नई सुपर किंग्स ट्रेड विंडोत सर्वात सक्रिय होती. कारण संजू सॅमसनला संघात घेण्यासाठी दोन महत्त्वाच्या खेळाडूंची डील केली. चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्ससोब ट्रेड डील करत रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांना ट्रेड केलं. ही डील पूर्ण होत नाही तोच आता रिटेन केलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी समोर आली आहे. सर्व फ्रँचायझींना शक्य तितके खेळाडू कायम ठेवण्याचे स्वातंत्र्य आहे. कारण यंदा मिनी लिलाव असेल. त्यामुळे संघांना जास्त अधिकचे खेळाडू रिटेन करता आलेत. चेन्नई सुपर किंग्सने नऊ खेळाडूंना रिलीज केलं आहे. यात मथीशा पथिराना सारख्या दिग्गज खेळाडूंचं नाव आहे. 15 नोव्हेंबरला फ्रेंचायझींनी बीसीसीआयकडे रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आता ही यादी समोर आली आहे.
या खेळाडूंना केलं रिलीजचेन्नई सुपर किंग्सने राहुल त्रिपाठी, वंश बेदी, सी आंद्रे सिद्धार्थ, दीपक हुड्डा, रचिन रविंद्र, विजय शंकर, शेख रसीद, कमलेश नागरकोटी आणि मथीशा पथिराना यांना रिलीज केलं आहे. या नऊ खेळाडूंना रिलीज केलं आहे. राहुल त्रिपाठीसाठी 3.40 कोटी, वंश बेदीसाठी 55 लाख, आंद्रे सिद्धार्थसाठी 30 लाख, दीपक हुड्डासाठी 1 कोटी 70 लाख, रचिन रविंद्रसाठी 4 कोटी, विजय शंकरसाठी 1 कोटी 20 लाख, शेख रशीदसाठी 30 लाख, कमलेश नागरकोटीसाठी 30 लाख आणि मथीशा पथिरानासाठी 13 कोटी मोजले होते. आता या खेळाडूंची एकूण रक्कम चेन्नई सुपर किंग्सला मिनी लिलावात वापरता येणार आहे. त्यामुळे आता कोणत्या खेळाडूंवर डाव लावणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
चेन्नई सुपर किंग्सने या खेळाडूंना रिटेन केलंऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), एमएस धोनी, डेवाल्ड ब्रेविस, उर्विल पटेल, डेवोन कॉन्वे, आयुष म्हात्रे, शिवम दुबे, अंशुल कम्बोज, रामकृष्ण घोष, जेमी ओवरटन, श्रेयस गोपाल, मुकेश चौधरी, नाथन एलिस, गुरजपनीत सिंह, नूर अहमद, खलील अहमद