जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मुलतानी मातीने उपचार केले तर ते तुमची त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनवू शकते.
ते लावण्यासाठी प्रथम एका भांड्यात मुलतानी माती घ्या. नंतर त्यात पाणी मिसळा आणि दोन चमचे गुलाबजल टाका.
आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि किमान 10 मिनिटे कोरडे होऊ द्या. यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. ही प्रक्रिया तीन ते चार दिवस नियमित केल्यास तुमची त्वचा तजेलदार होईल आणि चेहरा आकर्षक दिसेल.