आपल्या मुलांनी आपल्या डोळ्यासमोर यशस्वी व्हावं असं प्रत्येक वडिलांचे स्वप्न असतं. असंच स्वप्न मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील अंजली सोंधियाच्या वडिलांचे होते. अंजलीने अधिकारी व्हावे असं त्यांना वाटत होतं, मात्र नियतीच्या मनात काही वेगळचं होतं. अंजली कठीण परिस्थितीवर मात करत अधिकारी बनली, मात्र हे यश पाहण्यासाठी तिचे वडील हयात नव्हते. आज आपण अंजली सोंधियाच्या संघर्षाची कहाणी जाणून घेणार आहोत.
अंजली ही मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील चंद्रपुरा येथील रहिवासी आहे. तिचे वडील सुरेश सोंधिया शेतकरी होते आणि त्यांची मुलगी अधिकारी व्हावी अशी त्यांची इच्छा होती, कठोर परिश्रम आणि प्रतिकुल परिस्थितीवर मात करत ती 2024 मध्ये यूपीएससी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (आयएफएस) परीक्षेत नववी रँक मिळवली. मात्र इथपर्यंतचा तिचा प्रवास सोपा नव्हता. तिला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला.
आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अंजलीने युपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. 12 वी पास झाल्यानंतर अंजली अंजली इंदूरला गेली आणि पदवीचे शिक्षण पूर्ण केले. याच काळात तिने UPSC परीक्षेचा अभ्यास सुरू केला. तिने ऑनलाइन अभ्यास करत नोट्स बनवल्या आणि सतत अभ्यास सुरु ठेवला.
3 वेळा अपयशअंजलीने 2020 मध्ये UPSC ची परीक्षा दिली, हा तिचा पहिलाच प्रयत्न होता. यात ती नापास झाली. हार न मानता तिने पुन्हा परीक्षा दिली, यातही ती नापास झाली. 2023 मध्ये पुन्हा परीक्षा दिली त्यातही अपयश आले. ती पूर्वपरीक्षाही पास होऊ शकली नाही. या अपयशामुळे तिचा आत्मविश्वास कमी झाला. याच काळात तिच्या वडिलांचे निधन झाले, मात्र तरीही तिने अभ्यास सुरु ठेवला.
वडीलांचे गेले. अंजलीला तो क्षण नेहमीच आठवतो जेव्हा आर्थिक अडचणी तिच्या स्वप्नांमध्ये अडथळा आणत होत्या. तथापि, तिच्या वडिलांच्या निधनानंतर, तिच्या आईने तिला अधिकारी होण्यासाठी प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला. अंजली तिच्या ध्येयाकडे पुढे गेली आणि दिवसरात्र काम केले. यशोगाथा (पीसी-कॅनव्हा)
चौथ्या प्रयत्नात यशअंजलीने २०२४ मध्ये आयएफएस परीक्षा दिली आणि प्रिलिम्स उत्तीर्ण झाली. त्यानंतर तिने मुख्य आणि मुलाखतीत चांगली कामगिरी केली. परीक्षेचा निकाल जाहीर झाला तेव्हा तिचे नाव यादीच्या पहिल्या पानावर होते. या वर्षी एकूण १४३ उमेदवार आयएफएस परीक्षा उत्तीर्ण झाले होते. अंजलीचे यश तिच्या कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण होता.