अजय देवगणच्या 'दे दे प्यार दे 2' चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
रश्मिका मंदानाचा 'द गर्लफ्रेंड' चित्रपट 7 नोव्हेंबरला रिलीज झाला आहे.
'दे दे प्यार दे 2' चित्रपट अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंहचा रोमँटिक-कॉमेडी चित्रपट आहे.
अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंहचा 'दे दे प्यार दे 2' सिनेमा 14 नोव्हेंबर 2025 ला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा एक रोमँटिक-कॉमेडी ड्रामा आहे. त्याचसोबत थिएटरमध्ये रश्मिका मंदानाचा 'द गर्लफ्रेंड' आणि इमरान हाश्मीचा 'हक' चित्रपट दिसत आहे. रविवारी चित्रपटाने किती कोटींची कमाई केली जाणून घेऊयात. मीडिया रिपोर्टनुसार 'दे दे प्यार दे 2'ने 30 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
View this post on Instagram
Sacnilk च्या रिपोर्टनुसारनुसार, 'दे दे प्यारदे 2' चित्रपटाने रविवारी 13.75 कोटी रुपये कमावले आहे. चित्रपटाने तीन दिवसांत एकूण 34.75 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
पहिला दिवस - 8.75 कोटी रुपये
दुसरा दिवस - 12.25 कोटी रुपये
तिसरा दिवस - 13.75 कोटी रुपये
एकूण - 34.75 कोटी रुपये
रश्मिका मंदाना 'द गर्लफ्रेंड' चित्रपट 7 नोव्हेंबरला रिलीज झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाने रविवारी 1.60 कोटी कमावले आहे. त्यामुळे 'द गर्लफ्रेंड' सिनेमाचे एकूण कलेक्शन 15.50 कोटी रुपये झाले.
View this post on Instagram
इमरान हाश्मीचा 'हक' चित्रपट 7 नोव्हेंबरला रिलीज झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाने रविवारी 1.20 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. आतापर्यंत चित्रपटाचे एकूण कलेक्शन 16.95 कोटी झाले आहेत.
'दे दे प्यार दे 2' चित्रपट'दे दे प्यार दे 2' चित्रपट 2019 साली रिलीज झालेल्या 'दे दे प्यार दे' सिनेमाचा सीक्वल आहे. पहिल्या भागात अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंहसोबत तब्बू देखील मुख्य भूमिकेत होती. तर दुसऱ्या भागात अजय देवगण, रकुल आणि आर. माधवन मुख्य भूमिकेत झळकले आहेत. चित्रपटात गौतमी कपूर, जावेद जाफरी, मीजान जाफरी, इशिता दत्ता आणि जानकी बोडीवाला हे कलाकार देखील झळकले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 'दे दे प्यार दे 2' नवीन वर्षात जानेवारीमध्ये ओटीटीवर पाहता येणार.
Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर पोहचली वाराणसीला; घेतलं काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन, पाहा PHOTOS