पुणे : नागरिकांना ‘आरोग्य साक्षर’ करणारे आणि ‘फूडफार्मर’ या नावाने ओळखले जाणारे रेवंत हिमत्सिंगका यांच्या मार्गदर्शन सत्राची पर्वणी पुणेकरांना मिळणार आहे. ‘डिकोडिंग लेबल्स’ अर्थात खाद्यपदार्थांवरील लेबल्स कसे वाचायचे, हे या सत्रात सोप्या शब्दांत उलगडणार आहे.
‘सकाळ’ प्रस्तुत ‘सुहाना स्वास्थ्यम्’ या महोत्सवांतर्गत हे सत्र होणार आहे. या महोत्सवासाठी ‘सुहाना मसाले’ हे मुख्य प्रायोजक आहेत. विश्वकर्मा विद्यापीठ हे सहप्रायोजक असून, भारती विद्यापीठ हे सहयोगी प्रायोजक आहेत. यात ७ डिसेंबरला हॉटेल कॉनरॉड येथे होणाऱ्या विशेष व्याख्यान सत्रांमध्ये रेवंत यांच्या व्याख्यानाचा समावेश आहे. या सत्राला विनामूल्य प्रवेश आहे, मात्र नोंदणी आवश्यक आहे. नोंदणीसाठी बातमीसोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करावा, असे आवाहन ‘सकाळ माध्यम समूहा’ने केले आहे.
आपण एखादा खाद्यपदार्थ विकत घेतो अन् त्याच्यावरील मजकूर न वाचताच त्यातील चविष्ट पदार्थांचा मनमुराद आस्वाद घेतो; परंतु तो खाद्यपदार्थ तुमच्या आरोग्यासाठी खरंच योग्य आहे का, ते पाकीटबंद खाद्यपदार्थ खाल्ल्याने तुमचे आरोग्य धोक्यात येणार आहे का, अशा प्रश्नांची उत्तरं अत्यंत परखडपणे नागरिकांसमोर आणण्याचा प्रयत्न रेवंत हिमत्सिंगका करतात.
Nashik Crime : शहरातील सुरक्षा पुन्हा धोक्यात! वाहनांवरील हल्ल्यांनी नाशिककरांना धक्का; दोन संशयित ताब्यात रेवंत हिमत्सिंगका यांच्याबद्दल..देशातील नागरिकांमध्ये निरोगी आरोग्य आणि स्वच्छ अन्न पर्याय, खाद्यपदार्थांवरील अन्न लेबल्स कसे वाचायचे, याबाबत जागृतीसाठी प्रयत्न करणारे कार्यकर्ते अशी त्यांची ओळख. आपले यशस्वी करिअर सोडून त्यांनी देशातील लोकांना स्वच्छ, सुरक्षित अन्न पर्याय आणि खाद्यपदार्थांवरील लेबल कसे वाचायचे, हे शिकविण्यासाठी काम सुरू केले. त्यांचे समाज माध्यमांवर ५० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ‘लेबल पढेगा इंडिया’ चळवळ, ‘शुगर बोर्ड मूव्हमेंट’ अशा त्यांच्या काही विशेष गाजलेल्या मोहिमा आहेत.
आरोग्य साक्षरतेसाठी प्रयत्न करणारे कार्यकर्तेरेवंत यांनी एमबीए केले असून, ते ‘मेकॅन्झी’मध्ये सल्लागार होते. ते प्रमाणित आरोग्य प्रशिक्षकदेखील आहेत. देशातील नागरिकांना आरोग्य साक्षर बनविण्याच्या योगदानाबद्दल त्यांना ‘मानद डॉक्टरेट’ पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. पोषण कौशल्ये आणि व्यावसायिक पार्श्वभूमीचा समन्वय साधत रेवंत यांनी ‘ओन्ली व्हॉट्स नीडेड’ हे नवे व्यासपीठ सुरू केले आहे. लोकशाही पद्धतीने विकसित केलेले हे व्यासपीठ आहे.