भारतात रस्ते अपघाती मृत्यूचे प्रमाण प्रचंड मोठे आहे.परंतू एक छोटासा फिचर Daytime Running Light ( DRL ) रस्ते अपघात रोखण्यास फार उपयुक्त ठरत आहे. ऑटो इंडस्ट्रीजच्या एक्सपर्ट्स आणि मॅकनिक देखील आता एका सुरात सांगत आहे की DRL कोणतीही फॅशन नाही. तर प्राण वाचवणारे फिचर आहे. त्यामुळे अनेक देशांनी वाहनांमध्ये हे फिचर्स अनिवार्य केले आहे. काय आहे फिचर्स पाहूयात…
अनेक वाहन अपघात यासाठी होतात की ड्रायव्हरला समोरची गाडी वेळीच दिसत नाही. आणि Daytime Running Light (DRL) या फिचर्सचा उद्देश्यच याच एक सेंकदाच्या उशीराला कमी करणे हा आहे. मंद प्रकाशाची ही लाईट्स तुमच्या कारला दूरवरुन वेगळी आणि स्पष्ट दाखवते. मग कडक ऊन असो की कारचा रंग बँकग्राऊंडमध्ये मिसळून जाणारा असो.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार कारचा रंग जर सफेद, सिल्व्हर आणि ग्रे असेल तर नेहमी दिवसाच्या रस्त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये तो मिक्स होतो. DRL या कारला तातडीने व्हिजिबल बनवते. आणि दुसऱ्या ड्रायव्हरला सावधान करते की समोर वाहन येत आहे.
चौकात, घराच्या कोपरे आणि व्यस्त बाजारात असे अपघात नेहमीच होतात. जेथे एक वाहन दुसऱ्या वाहनाला साईडने येताना दिसत नाही. DRL या खास करुन अशा स्थितीत उपयोगी साबित होते.याची सतत जळणारा हलका प्रकाश दुसऱ्या दिशेने येणाऱ्या वाहनातील ड्रायव्हर आपल्या अस्तित्वाचा संकेत देते. ज्यामुळे टक्कर होण्याची शक्यता कमी होते.
दिवसाचा वेळ असो की हवामान स्वच्छ नसेल तर अशा स्थितीत DRL एखाद्या हिरोसारखीच काम करते. हलक्या धुक्यात, धुळीच्या हवेत वा पावसात ही वाहनाची पोझिशनला एकदम साफ करते. कारण DRL खूप कमी पॉवर खेचते. यामुळे ती बॅटरीवर खास दबाव टाकत नाही.
कार मॅकेनिकचा सल्ला आहे की भारतासारख्या देशात DRL ही गरज आणखीन वाढते. कारण येथे दिवसाचे सुमारे 50 टक्के रस्ते वाहन अपघात कमी दृश्यमानतेमुळे होतात.
1. जर कारमध्ये DRL फिचर असेल तर कायम ऑन ठेवा
2. DRL लावताना ब्रायटनेस आणि गुणवत्तेशी समझोता करु नका
3. DRL आता केवळ डिझाईनचा भाग नाही , तर रस्ते सुरक्षेचा एक भरोसेमंद उपाय बनला आहे.