Viral Video: प्रथम SEXची मागणी केली, नंतर हस्तमैथुन... महिला प्रवाशासोबत अश्लील वर्तन, सगळं काही व्हिडिओत कैद!
esakal November 19, 2025 02:45 PM

श्रीलंकेत एकट्याने ऑटोरिक्षातून प्रवास करणाऱ्या न्यूझीलंडच्या एका महिला पर्यटकाला एका तरुणाने प्रथम लैंगिक संबंधाची मागणी केली आणि नंतर थेट हस्तमैथुन करून तिचा छळ केला. हा संपूर्ण प्रकार तिने स्वतःच्या मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला असून, तो व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे. या घटनेची दखल घेत श्रीलंकन पोलिसांनी २३ वर्षीय आरोपीला तात्काळ अटक केली.

भयावह अनुभवकथा

पीडित महिलेने इंस्टाग्रामवरआपली भयावह अनुभवकथा शेअर केली आहे. ती गेल्या अनेक दिवसांपासून श्रीलंकेत फिरत होती. चौथ्या दिवशी सकाळी समुद्रकिनाऱ्यावर सूर्योदय पाहून ती आनंदाने निघाली होती. पण काही वेळातच एक स्कूटरस्वार तरुण तिच्या मागे लागला. व्हायरल व्हिडिओत तो तरुण वारंवार तिच्या ऑटोरिक्षासमोर येऊन वेग कमी करतो, तिला ओव्हरटेक करण्यास भाग पाडतो आणि पुन्हा पुढे जाऊन तिची वाट अडवतो.

सगळे कृत्य कॅमेऱ्यात कैद

सुरुवातीला तिने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही, पण त्याचे वर्तन दिवसेंदिवस धोकादायक होत गेले. पाणी पिण्यासाठी आणि विश्रांतीसाठी ती थांबली, तेव्हा तो पुन्हा समोर आला. काही क्षण गप्पा मारल्या, पण लगेच त्याने “तू कुठे राहतेस?” असा प्रश्न विचारला आणि मग थेट सेक्सची मागणी केली. तिने स्पष्ट नकार दिला तरी तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. उलट त्याने स्कूटरवरूनच पॅन्ट खाली करून हस्तमैथुनास सुरुवात केली आणि हे सगळे कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले.

Mumbai Viral Video: मर्द को भी दर्द होता है... मुंबईत स्टेशनवर काय घडलं? लोकलची वाट पाहणारा तरुण का रडत होता? प्रचंड धक्का

घाबरलेल्या त्या महिलेने लगेच तिथून काढता पाय घेतला. ती म्हणते, “त्याच्या या कृत्याने मला प्रचंड धक्का बसला. मी नकार दिल्यानंतरही त्याने इतके निर्लज्ज वर्तन केले, यामुळे संपूर्ण प्रवासात असुरक्षित वाटत राहिले. माझा सगळा आनंद एका क्षणात नष्ट झाला.”

View this post on Instagram
एका व्यक्तीचा विकृतपणा

तरीही ती खचली नाही. तिने ठामपणे सांगितले की, एकट्या महिला प्रवाशाला अशा घटनांना सामोरे जावे लागते, ही वस्तुस्थिती आहे. पण त्यामुळे ती आपला प्रवास अर्धवट सोडणार नाही. तिने नमूद केले की, ही घटना संपूर्ण श्रीलंकेचे चित्र नाही.

“स्थानिक लोक अत्यंत मदतगार आणि प्रेमळ आहेत. हा फक्त एका व्यक्तीचा विकृतपणा आहे, जो संपूर्ण देशाला बदनाम करू शकत नाही,” असे तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

हा व्हिडिओ शेअर करायचा की नाही, यावर तिने खूप विचार केला. पण शेवटी एकट्या महिला प्रवाशांची वास्तविकता जगासमोर आणण्यासाठी तिने तो प्रसिद्ध केला. या प्रकरणी श्रीलंकन पोलिसांनी त्वरित कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

Viral Video: आईचं प्रेम जळत नाही! स्वतः भाजूनही पिल्लांना मृत्यूतून ओढून काढणारी माऊली, हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल
View this post on Instagram
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.