प्रेमानंद महाराज हे आपल्या प्रवचनांसाठी प्रसिद्ध आहेत, त्यांची प्रवचन ऐकण्यासाठी देशभरातून भक्त मोठ्या प्रमाणात वृंदावनमध्ये गर्दी करत असतात. प्रेमानंद महाराज यांच्या प्रवचनादरम्यान त्यांचे भक्त त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारतात आणि महाराज देखील त्या प्रश्नांची उत्तर देऊन आपल्या भक्तांचे समाधन करतात.असंच एकदा प्रेमानंद महाराज यांचं प्रवचन सुरू असताना एका तरुणाने त्यांना प्रश्न विचारला, हे कलीयुग आहे, तर कलीयुगामध्ये असं काय करावं ज्यामुळे मोक्ष मिळेल, सर्व प्रकारच्या पापांपासून मला मुक्ती मिळेल? यावर प्रेमानंद महाराज यांनी नेमकं काय म्हटलं आहे? ते जाणून घेऊयात.
प्रेमानंद महाराज म्हणतात की, एका छोट्याशा दिव्यामध्ये कापसाचा संपूर्ण डोंगर जाळून टाकण्याची शक्ती आहे, त्याचप्रमाणे ईश्वरामध्ये देखील तुमची संपूर्ण पापे नष्ट करण्याची शक्ती आहे, पण त्यासाठी फक्त एकच अट आहे, ती म्हणजे तुम्ही स्वत: देवाला समर्पित झालं पाहिजे. प्रेमानंद महाराज म्हणतात भगवान श्रीकृष्ण यांनी भगवत गितेमध्ये सांगितलं आहे की, सर्व कर्म, धर्म, असक्ती सोडून द्या आणि मला शरण या, त्याचप्रमाणे तुम्ही जर भगवान श्रीकृष्ण यांना शरण गेले तर तुम्हाला सर्व पापातून मुक्ती मिळेल. तुमचा उद्धार होईल. असं प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे.
प्रेमानंद महाराज पुढे असंही म्हणतात जो इश्वराला शरण जातो, त्याचा उद्धार होतो. मात्र त्यासाठी तुम्ही सर्व प्रकारचा मोह, माया त्यागली पाहिजे. तुमची नक्कीच सर्व पापांमधून मुक्त्तता होईल, तुम्हाला जर शांती हवी असेल तर ईश्वराला शरण जा, असा सल्ला प्रेमानंद महाराज यांनी आपल्या भक्तांना दिला आहे. प्रेमानंद महाराज यांची प्रवचनं जग प्रसिद्ध आहेत. जगभरात त्याचे भक्त आहेत. प्रेमानंद महाराज नेहमीच आपल्या भक्तांना प्रवचनांच्या माध्यमातून उपदेश करत असतात. ते आपल्या प्रवचनामधून भक्तांना भक्ती मार्गाचं महत्त्व सांगतात. ईश्वराला शरण जा, सर्व पापांमधून मुक्ती मिळेल असं प्रेमानंद महाराज यांनी सांगितलं आहे.
(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)