इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) नुसार, 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,22,561 रुपये नोंदवली गेली आहे, जी यापूर्वी 1,23,884 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. गेल्या 24 तासांत सोन्याच्या दरात 1,323 रुपये प्रती 10 ग्रॅमची घट नोंदवली गेली आहे. त्याचप्रमाणे, 22 कॅरेट सोनेही 1,212 रुपये प्रती 10 ग्रॅमने घसरून 1,12,266 रुपये प्रती 10 ग्रॅमवर आले आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाल्यास तेही 992 रुपये प्रती 10 ग्रॅमने घसरून 91,921 रुपये प्रती 10 ग्रॅम झाले आहे.
एक किलोग्राम चांदीचा भाव घसरून 1,54,113 रुपयांवर आला आहे, जो यापूर्वी 1,58,120 रुपये प्रती किलोग्राम नोंदवला गेला होता. चांदीच्या किंमतीत 4007 रुपये प्रती किलोग्रामची घट नोंदवली गेली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या अधिकृत वेबसाइटवर सोने-चांदीच्या किंमती दिवसातून दोनदा अपडेट केल्या जातात. सोने-चांदीच्या किंमती सकाळी एकदा अपडेट झाल्यानंतर संध्याकाळी अपडेट केल्या जातात.
आंतरराष्ट्रीय बाजारातही देशांतर्गत बाजाराप्रमाणे सोने आणि चांदीच्या किंमतीत घट नोंदवली गेली आहे. कॉमेक्सवर सोन्याचा दर 0.11 टक्क्याने कमी होऊन 4,078.20 डॉलर प्रती औंस आणि चांदीचा दर 0.27 टक्क्याने कमी होऊन 50.71 डॉलर प्रति औंस झाला आहे.
तसेच, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर 5 डिसेंबर 2025 च्या सोन्याच्या कराराचा दर 0.06 टक्क्याने वाढून 1,23,130 रुपयांवर पोहोचला आहे, तर चांदीच्या 05 डिसेंबर 2025 च्या कराराचा दर 0.08 टक्के वाढीनंतर 1,55,225 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे जर तुम्ही लग्नसराईसाठी सोन्या चांदीची खरेदी करु इच्छिता तर नक्की करा. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही)