Stock Market Crash : शेअर बाजारात आज तब्बल 3.50 लाख कोटींचे नुकसान; 2,531 शेअर्स तोट्यात; हे आहे कारण!
esakal November 22, 2025 02:45 AM

Indian Stock Market Loss : आजचा दिवस जागतिक बाजारपासून आशियाई शेअर्सपर्यंत अतिशय तोट्याचा ठरला. फक्त एका महत्त्वाच्या बातमीमुळे जगभरातील बाजार अचानक कोसळले. याचा मोठा परिणाम भारतीय शेअर बाजारातही झाला आहे.


सकाळी 11.45 वाजता निफ्टी निर्देशांक 120 अंकांनी घसरून 26,072 वर आला, तर सेन्सेक्स 380 अंकांनी घसरून 85,250 वर ट्रेड करत होता. तर नुकतच उच्चांक पातळीवर पोहचलेल्या निफ्टी बँकेत तब्बल 430 अंकांची मोठी घसरण झाली.

3.50 लाख कोटींचे नुकसान

शेअर बाजारातील या भूकंपामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 3.50 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 20 नोव्हेंबर रोजी बीएसई सेन्सेक्सचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन 476.41 लाख कोटी होते, जे आज कमी होऊन 473 लाख कोटी झाले आहे.

बीएसईवरील टॉप 30 पैकी 22 शेअर्स तोट्यात

बीएसईतील टॉप 30 शेअर्सपैकी 22 शेअर्स घसरणीत, तर फक्त 8 शेअर्स हलक्या वाढीसह व्यापार करत आहेत. यात Tata Steel, Adani Ports , Zomato , ICICI Bank यांच्या शेअर्समध्ये 1% पेक्षा जास्त घसरण होऊन ते लाल रंगात व्यवहार करत होते.


दरम्यान, Mahindra and Mahindra (M&M) मध्ये 1.34% आणि Maruti Suzuki मध्ये 0.30% वाढ होऊन हिरव्या रंगात व्यवहार करताना दिसले.

2,531 शेअर्स लाल रंगात


सेन्सेक्सवर 132 शेअर्स अपर सर्किटमध्ये आणि 133 शेअर्स लोअर सर्किटमध्ये आहेत. 3,882 शेअर्सपैकी 1,160 शेअर्स वाढीसह, तर तब्बल 2,531 शेअर्स लाल रंगात व्यवहार करत आहेत. 191 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.

कोणते शेअर्स सर्वात जास्त तोट्यात?

बाजारातील Banko Products आणि JP Power शेअर्समध्ये 5% पेक्षा जास्त घसरण झाली. तसेच Zen Tech, Garden Reach Shipbuilders, Hitachi, Vishal Mega Mart, BDL, JSW Energy या शेअर्समध्येही 2% पेक्षा जास्त घट झाली.

शेअर बाजार का घसरला?


आजच्या घसरणीचे सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिकेच्या जॉब डेटा मध्ये झालेली वाढ, ज्यामुळे डिसेंबरमध्ये US फेड दरांमध्ये मध्ये घट होण्याची शक्यता कमी झाली. याच कारणामुळे जागतिक बाजरापासून आशियाई बाजारांमध्ये मोठी घसरण बघायला मिळाली.

जागतिक बाजाराची स्थिती
  • दक्षिण कोरियाचा KOSPI तब्बल 3% पेक्षा जास्त घसरला.

  • जपानचा Nikkei 225 ही 2% पेक्षा जास्त घसरला.

  • अमेरिकी Nasdaq – 2.15% घसरला.

  • S&P 500 ही 1.56% ने कमी झाला.

  • Dow Jones मध्येही 0.84% घट.

  • © Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.