बिग बॉस मराठी विजेता शिव ठाकरे याचा मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहतो. अशातच दोन दिवसापूर्वी शिव ठाकरेच्या मुंबईतील घराला आग लागली होती. या आगीत त्याची लिव्हिंग रुम पुर्णपणे जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवण्यात आली.
त्यांच्या घराचे व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. दोन वर्षापूर्वीच त्याने मुंबईत घर घेतलं होतं. मात्र आज त्यांच्यावर ही परिस्थिती आहे. दरम्यान अभिनेता शिव ठाकरेनं संपुर्ण घटनाक्रमाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
View this post on Instagram
शिव ठाकरेच्या घरी आग लागली आणि बातमी वाऱ्यासारखी पसरली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचं सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत त्याने सांगितलं. दरम्यान अशातच त्याने व्हिरल भयानीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्या घटनेबद्दल सांगितलं आहे. शिव म्हणाला, 'जेव्हा आग लागली त्यावेळी मी घरातच होते. मी झोपलो होतो. अख्खं घर जळत होतं. यातलं मला काहीच कळलं नाही. कारण बाहेरुन काहीच आवाज येत नव्हता. ना सायरनचा आवजा ना कसलाच. देवाच्या कृपने मी वाचलो. माझ्या घरी काम करणारी बाई देव बनून आली. तिने दार ठोठावलं मी बाहेर येऊन पाहिलं तर रात्रीसारखा अंधार झाला होता. मी देवाच्या कृपनेचं वाचलो आहे.'
View this post on Instagram
पुढे बोलतना शिव म्हणाला की, 'घरात मोठं नुकसान झालं आहे. परंतु ते पुन्हा कमवता येईल. देव सोबत आहे तर अजून काय पाहिजे. नुकसान झाल्याचं 2 सेकंदासाठी वाईट वाटलं. कारण सगळं मेहनतीनं कमावलं होतं. सगळ्यात जास्त ट्रॉफी जळाल्या त्याचं वाईट वाटलं. बाकी पैसे तर मी कसेही कमवीन. जी शाबासकी तुम्हाला मिळाली असते, ती जळताना पाहून जास्त दु:ख होतं.'
जिला कधी अपमानित केलं… तीच ठरली जगाची राणी! मेक्सिकोची फातिमा बॉश मिस यूनिव्हर्स विजेती; भारताची मनिका ‘या’ क्रमांकावर