Code of Conduct
महाराष्ट्रात निवडणुकांची रणधुमाळी
महाराष्ट्रात सध्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे.
Code of Conduct
मतदान आणि मतमोजणी कधी?
राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
आचार संहिता कधी लागू होते?
निवडणूक प्रक्रिया सुरू होताच आचार संहिता लागू होते. निवडणूक आयोग जेव्हा कोणत्याही निवडणुकीची अधिसूचना जारी करतो, त्या दिवसापासून संपूर्ण राज्यात आचार संहितेचे नियम लागू होतात.
What is Code of Conduct? आचार संहितेचा उद्देश काय?
ही कोणतीही कायदेशीर तरतूद नाही; तर राजकीय पक्षांच्या परस्पर सहमतीने बनवलेली पद्धत आहे. निवडणुका निष्पक्ष आणि शांततेत पार पडाव्यात, या उद्देशाने सरकार, राजकीय नेते आणि सर्वच पक्षांना या नियमांचे पालन करावे लागते.
आचार संहिता मतदान संपताच हटते का?
आचार संहितेच्या काळात प्रशासनिक आणि राजकीय हालचालींवर अनेक निर्बंध लागू होतात. पण महत्वाचा प्रश्न असा उपस्थित होतो की, निवडणुकीचे निकाल जाहीर होताच आचार संहिता आपोआप हटते का?
आचार संहिता कधी संपते?
प्रत्यक्षात असे होत नाही. मतदानाची प्रक्रिया पूर्ण होताच आचार संहिता हटते, ही सर्वसाधारण समजूत असली तरी ती स्वयंचलितपणे हटत नाही. यासाठी निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र आदेश जारी केला जातो.
Code Of Conduct आचार संहितेचे प्रमुख निर्बंध
त्या आदेशात आचार संहिता कधी आणि कोणत्या वेळेपासून संपुष्टात येईल, याची स्पष्ट माहिती दिलेली असते. निकाल पूर्णपणे जाहीर होईपर्यंत आणि सरकार स्थापन होण्याची प्रक्रिया सुरू होईपर्यंत आचार संहिता लागू राहते.
नवीन सरकारी भरती आणि विविध परीक्षा यावर तात्पुरती बंदी लागू होते.
दारू दुकाने व ठेक्यांच्या नीलामीवरही रोक लावली जाते.
सरकारी जाहिराती, होर्डिंग्ज आणि नवीन योजनांच्या उद्घाटनाला मनाई केली जाते.
अधिकाऱ्यांचे बदली आदेश निवडणूक आयोगाच्या मंजुरीशिवाय दिले जाऊ शकत नाहीत.
जनसभा आयोजित करण्यासाठीही ठरावीक वेळ पाळावी लागते
सकाळी 6 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंतच सभा घेण्याची मुभा असते.
Next : सरकारी योजनांसाठी लिंक केलेला मोबाईल नंबर ठरला 'ब्रह्मास्त्र'! बेपत्ता महिला अन् आरोपींचा 'असा' लागला छडा! येथे क्लिक करा