ऑस्ट्रेलियन संघाला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड नाहीत. पण त्यांची उणीव मिचेल स्टार्कने काय भासू दिली आहे. मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलियन गोलंदाजीची धार मजबूत असल्याचं दाखवून दिलं. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या वाटेला प्रथम गोलंदाजी आली. त्यामुळे कर्णधार स्टीव्हन स्मिथ नाराज होता. पण मिचेल स्टार्कने त्याची नाराजी दूर केली. त्याने एक दोन नाही तर 7 विकेट काढले. इतकंच काय तर 14 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत जे शक्य झालं नाही ते करून दाखवलं. मिचेल स्टार्कने पहिल्या षटकापासून विकेट घेण्याची सुरूवात केली. तर 12.5 षटकं टाकत 7 गडी बाद केले. त्याच्या घातक गोलंदाजीमुळे इंग्लंडचा संघ बॅकफूटवर गेला.
14 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच केलं असं…मिचेल स्टार्कने पहिल्या स्पेलच्या 6 षटकात 17 धावा देत तीन गडी बाद केले. यात जॅक क्राउली आणि बेन डकेटची विकेट होती. यानंतर जो रूटची विकेट काढली. तीन विकेटपैकी क्राउली आणि जो रूट यांना खातंही खोलता आलं नाही. मिचेल स्टार्कने दुसऱ्या सेशनच्या स्पेलमध्ये आणखी चार विकेट काढल्या. बेन स्टोक्स, गस एटकिंसन, जेमी स्मिथ आणि मार्क वूड यांची विकेट काढली. मिचेल स्टार्कने 2011 मध्ये कसोटीत डेब्यू केलं होतं. या 14 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच कसोटीत 7 विकेट काढल्या आहे. यापूर्वी त्याने 9 धावा देत 6 विकेट काढल्या होत्या. मिचेल स्टार्कने 5 विकेटचा टप्पा 17व्यांदा पार पाडला आहे.
जो रूटला बाद करत दोन टप्पे गाठलेमिचेल स्टार्कने जो रूटची विकेट काढताच एशेज कसोटी मालिकेच्या इतिहासात 100 विकेट पूर्ण केल्या आहे. एशेजमध्ये 100 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेणारा 20वा आणि ऑस्ट्रेलियाचा 13 गोलंदाज ठरला आहे. इतकंच काय तर कर्टली एंब्रोजची कसोटी विकेटशी बरोबरी केली आहे. दोघांच्या नावावर प्रत्येकी 405 विकेट आहेत. पण एंब्रोजच्या तुलनेत कमी चेंडूत त्याने हा टप्पा गाठला आहे. 2980 चेंडूत त्याने इतक्या विकेट घेतल्या आहेत.