खेड पंचायत समितीच्या कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटातील शिवसेनेच्या इच्छुक उमेदवार तनुजा निलेश पवार यांच्या घरासमोर काळा जादू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
दुचाकीवर जाणाऱ्या एका इसमाने तनुजा पवार यांच्या निघोजे येथील घरासमोर काळा जादूटोणा केलेले दोन लिंबू फेकले आहेत.
दुचाकीवर आलेला तरुण तनुजा पवार यांच्या घरासमोर काळा जादूटोणा केलेल्या लिंबू फेकून पळून जात असतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहेत.
Latur Live : रेनापुर नगरपंचायत निवडणुकीतून ठाकरे सेनेच्या 11 उमेदवारांनी पूर्णपणे माघारलातूरच्या रेनापुर नगरपंचायत निवडणुकीतून ठाकरे सेनेच्या 11 उमेदवारांनी पूर्णपणे माघार घेतली आहे.
एकूण 16 पैकी 11 उमेदवारांनी माघार घेतल्याने चर्चेला उधाण आलय, तर पक्षश्रेष्ठीनीच मदत न केल्याने पक्षावर नाराजी देखील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
महाविकास आघाडीत मित्र पक्षांसोबत युती न झाल्याने उबाठा ने स्वबळाचा नारा देत नगरपंचायत निवडणूक हातात घेतली.
मात्र पक्षाकडून योग्य मार्गदर्शन आणि कुठलीच मदत मिळत नसल्याची नाराजी व्यक्त करत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह 11 उमेदवारांनी उमेदवारीचे फॉर्म विड्रॉल करत निवडणुकीतून पूर्णपणे माघार घेतली आहे.
Kolhapur Live : कोल्हापूरमध्ये TET ची प्रश्नपत्रिका फोडणारी टोळी ताब्यातकोल्हापूरमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा ( TET) ची प्रश्नपत्रिक फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी ९ जणांना ताब्यात घेतले आहे.
Pune Live : पुण्यात गाडी तोडफोड सत्र सुरूच फुरसुंगी परिसरात 15 ते 20 गाड्यांची केली तोडफोडफुरसुंगी आदर्शनगर परिसरात कोयता टोळीने चार चाकी,रिक्षाची केली तोडफोड
कोयता टोळीने घोषणाबाजी करत केली वाहनांची तोडफोड.
सीसीटीव्ही मध्ये धुमाकुळ घालताना व्हिडिओ समोर
Nagpur Live : मोबाईल न दिल्याने १३ वर्षीय मुलीने जीवन संपवलेनागपूरमध्ये पालकांनी मोबाईल न दिल्याने एका १३ वर्षीय मुलीने जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे.
Ulhasnagar Live : उल्हासनगरमध्ये शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांची रिक्षाचालकाला मारहाणउल्हासनगरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी एका रिक्षाचालकाला मारहाण केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Pune Live : पुण्यात वाघोली- लोहगाव रोडवर कारला भीषण आगकार क्रमांक MH 12 VL 0140 हे वाहन वाघोली वरून लोहगाव च्या दिशेने जात असताना डी मार्ट जवळ इंजिन जवळ शॉर्टसर्किट झाल्यामुळे त्या वाहनाला आग लागली होती सदरील वाहनाचे चालक अनिल राज यांनी आग लागलेली लक्षात येताच वाहन रोड च्या बाजूला घेतली वा काही मिनिटाच वाहनाला मोठा प्रमाणात आग लागली. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली.
Mumbai Live : लोखंडवाला परिसरात रेंज रोव्हर कारचा अपघातमुंबईतील लोखंडवाला परिसरात रेंज रोव्हर कार दुभाजकला धडकली. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही.
Live : सेव्हनहिल उड्डाणपुलावर भीषण अपघात: अचानक ब्रेकचा बळी ठरला ५ वर्षीय चिमुकलानागपूर– छत्रपती संभाजीनगरातील सेव्हनहिल उड्डाणपुलावर एका कारचालकाने वेगात जात असताना अचानक ब्रेक दाबल्याने तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या आणि या विचित्र अपघातात ५ वर्षीय अभिनव या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हायकोर्टाकडून आकाशवाणीच्या दिशेने धावणारी कार पुलाच्या मधोमध अचानक थांबली. तिच्या मागे असलेली अंड्यांची वाहतूक करणारी लोडिंग रिक्षा तत्काळ थांबली; मात्र मागून येणाऱ्या दोन कार रिक्षावर आणि एकमेकांवर आदळल्या. या धडकेत शेवटच्या कारच्या समोरील सीटवर बसलेल्या बालकाचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले असून, जवाहरनगर पोलिसांनी मात्र अद्याप अधिकृत मृत्यूची नोंद झालेली नसल्याचे सांगितले आहे.
Nagpur Live: रामटेकजवळ भीषण अपघात, दोन शेतमजूर महिलांचा जागीच मृत्यूरामटेकजवळील कांद्री माईन परिसरात सोमवारी सकाळी दुर्दैवी घटना घडली. भरधाव कारच्या भीषण धडकेत दोन शेतमजूर महिला मंदा उपासे (49) आणि प्रमिला शेंद्रे (41) यांचा जागीच मृत्यू झाला. दोघी पायी शेतात कामावर जात असताना कारने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून संतप्त नागरिकांनी कारला आग लावण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिकांच्या तत्परतेने आग वेळेत विझवण्यात आली. अपघातानंतर कारमधील कुणाल अहुजा, प्रशांत निसवानी आणि चालक सागर ठाकूर हे तिघेही वाहन टोलजवळ सोडून फरार झाले होते, परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. दुभाजक काढल्यामुळे वाढलेले अपघात, पथदिव्यांचा अभाव आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर नागरिकांनी जोरदार नाराजी व्यक्त केली. घटनास्थळी रामटेक SDPO रमेश बरकते यांनी पथकासह धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
दिल्लीला पुन्हा स्मॉगचा विळखा! AQI 429, ‘Severe’ श्रेणीत शहर ठप्पदिल्लीवर पुन्हा एकदा विषारी धुरक्याची चादर पसरली आहे. मायूर विहार आणि परिसरातील ड्रोन व्हिज्युअल्समध्ये संपूर्ण शहराला धूसर पडदा कवेत घेतल्याचं स्पष्ट दिसतंय. सेंट्रल पॉल्युशन कंट्रोल बोर्ड (CPCB) च्या माहितीनुसार या भागातील वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) तब्बल 429 वर पोहोचला आहे, जो थेट ‘Severe’ श्रेणीत मोडतो. यामुळे हवेत श्वास घेणं धोकादायक बनलं असून नागरिकांनी आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात येतोय.