पाकड्याची लाज गेली! BBL पदार्पणात Shaheen Afridi ला गोलंदाजी करण्यापासून रोखले; अम्पायरने कान टोचले, नेमके काय घडले? Video
esakal December 16, 2025 09:45 AM

Shaheen Afridi Big Bash League incident Video Viral : पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याच्यासाठी बिग बॅश लीगमधील पदार्पण लाजीरवाणा ठरला. BBL मध्ये ब्रिस्बन हिट संघाकडून पदार्पण करणाऱ्या शाहीनला षटक मध्येच सोडावे लागले. मैदानावरील अम्पायरने तातडीने अॅक्शन घेतली आणि त्यामुळे शाहीनला २.४ षटकानंतर गोलंदाजी करता आली नाही. त्याने १६.१२ च्या सरासरीने ४३ धावा दिल्या. मेलबर्न रेनेगाड्सच्या टीम सेईफर्टने पाकिस्तानी गोलंदाजाची चांगलीच धुलाई केली. त्यात अम्पायरने षटक थांबवल्याने त्याची जगासमोर इभ्रत गेली.

मेलबर्न विरुद्ध ब्रिस्बन या लढतीत शाहीनसह पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद रिझवान ( मेलबर्न) याचेही BBL मधील पदार्पण होते. पण, तोही ४ धावा करून माघारी परतला. टीम सेईफर्टने ५६ चेंडूंत ९ चौकार व ६ षटकारांसह १०२ धावांची खेळी केली. त्याने शाहीनच्या एका षटकात १९ धावा कुटल्या. त्याला ऑलिव्हर पिएकेची साथ मिळाली, त्याने २९ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ५७ धावांची खेळी केली. या दोघांच्या फटकेबाजीने संघाला ५ बाद २१२ धावांपर्यंत पोहोचवले.

IPL 2026 Auction : उद्या लिलाव अन् पठ्ठ्याने आज ठोकले खणखणीत शतक... कुटल्या १५ चेंडूंत ७२ धावा; RCB च्या माजी खेळाडूची धमाल शाहीन आफ्रिदीची गोलंदाजी का थांबवली?

शाहीन आफ्रिदीने त्याच्या पहिल्या दोन षटकांत भरपूर धावा दिल्या. तिसरे षटक टाकायला आला तेव्हाही तो महागडा ठरला होता. चौथ्या षटकानंतर त्याला अम्पायरने गोलंदाजी थांबवण्यास सांगितले. त्याने त्या चार चेंडूंत दोन फुलटॉस टाकल्याने अम्पायरला हा निर्णय घ्यावा लागला. त्याने २.४ षटकांत एकही विकेट न घेता ४३ धावा दिल्या.

View this post on Instagram

लक्ष्याचा पाठलाग करताना ब्रिस्बेनकडून कॉलिन मुन्रोने सलामीला येताना ३२ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह ५५ धावा चोपल्या. पण, अन्य फलंदाज अपयशी ठरले. जिमि पेइर्सन १५ चेंडूंत ३० धावांवर खेळतोय. हे वृत्त लिहिले तेव्हा ब्रिस्बेनने १७ षटकांत ६ बाद १५३ धावा केल्या होत्या आणि त्यांना विजयासाठी १८ चेंडूंत ६० धावांची गरज होती. मेलबर्नच्या जेसन बेहरेनडॉर्फ व विल सदरलँड यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या होत्या.

IPL Mock Auction: लायम लिव्हिंगस्टोनला १९ कोटी, सर्फराज खान CSK च्या ताफ्यात; वेंकटेश अय्यर अन् पृथ्वी शॉ यांना मिळाला खरीददार Shaheen Afridi career

शाहीनने जगभरातील विविध लीगमध्ये खेळताना २३९ सामन्यांत ३३४ विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त त्याने ९६ सामन्यांत १२६ विकेट्स घेतल्या आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.