आळेफाटा, ता. १५ : आळेफाटा (ता. जुन्नर) येथील उपबाजारात कांद्याची रविवारी (ता. १४) १७ हजार ४१० पिशव्यांची आवक होऊन प्रतवारी होऊन एक नंबर कांद्यास दहा किलोस ३२१ रुपये बाजारभाव मिळाला, अशी माहिती जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे व माजी उपसभापती प्रितम काळे यांनी दिली.
आळेफाटा येथे रविवारी झालेल्या मोढ्यांत एक नंबर मोठा आकाराच्या कांद्यास प्रतिदहा किलोला २७० ते ३२१ रुपये बाजारभाव मिळाला होता. एक नंबर सुपर कांद्यास २४० ते २७० रुपये, तर मध्यम दोन नंबर कांद्यास २२० ते २५० रुपये, तीन नंबर गोल्टी कांद्यास १६० ते २१० रुपये व बदला कांद्यास ५० ते १०० रुपये बाजारभाव मिळाला. दरम्यान, शुक्रवारी (ता. १२) झालेल्या कांदा लिलावात दहा किलोस ३०० रुपये बाजारभाव मिळाला होता. त्याच कांद्याला रविवारी प्रतिकिलो तीन ते चार रुपयांनी बाजारभाव वाढ झालेली आहे. सध्या बाजारात नविन कांदा विक्रीस येत आहेत. बाजारभावात वाढही झालेली आहे, असे कांदा व्यापारी रामदास शिंदे यांनी सांगितले.