Vaibhav Suryavanshi : भारताच्या सीनियर T20I संघात वैभवला घेण्याची चर्चा, पण तो ठरतोय अपात्र; कारण घ्या जाणून
esakal December 16, 2025 09:45 AM

Vaibhav Suryavanshi Indian team eligibility rules : ' वैभव सूर्यवंशी भारताच्या ट्वेंटी-२० संघात खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आयपीएलमध्ये त्याने आंतरराष्ट्रीय गोलंदाजांचा ज्या प्रकारे सामना केला, ते पाहा. देशांतर्गत स्पर्धाही तो गाजवतोय... त्याचे फटके मारण्याचं टायमिंग बघा. त्याला संघात घ्यायचं की नाही, हे BCCI वर अवलंबून आहे, मी माझं मत मांडलं आहे,' अशी प्रतिक्रिया वैभवचे पहिले कोच मनिष ओझा यांनी व्यक्त केले. सोशल मीडियावर मग चर्चाही सुरू झाली.. शुभमन गिलचा सध्याचा फॉर्म पाहता, भारतीय संघाला अभिषेक शर्माच्या जोडीला आक्रमक खेळाडू हवा आहे. वैभव त्यासाठी योग्य असल्याचे बोलले जातेय.. पण, तो टीम इंडियाच्या सीनियर संघातून खेळण्यास अपात्र आहे.. जाणून घ्या ICC चा नियम...

२०२५ हे वर्षात वैभव सूर्यवंशीच्या नावाची जादू पाहायला मिळाली.. गुगल सर्चमध्येही या १४ वर्षाच्या पोराने अव्वल स्थान पटकावले. १३ व्या वर्षी आयपीएल करार मिळणारा तो पहिला खेळाडू ठरला. त्यानंतर राजस्थान रॉयल्सकडून IPL 2025 खेळताना त्याने ३५ चेंडूंत लीगमधील वेगवान शतकाचा पराक्रम केला. त्याच्या वयावरून उलटसुलट चर्चाही सुरू झाली, परंतु त्याच्या खेळावर याचा काही परिणाम नाही झाला.

विराट कोहलीपेक्षा लोकांनी तुझ्याबद्दल जास्त Google Search केलं, कसं वाटतंय? Vaibhav Suryavanshi ने दिलेल्या उत्तराची चर्चा…

आयपीएलमध्ये वैभवने गुजरात टायटन्सविरुद्ध ३५ चेंडूंत शतक झळकावले, जे या स्पर्धा इतिहासातील भारतीयाने झळकावलेले वेगवान शतक ठरले. त्यानंतर त्याने १९ वर्षांखालील भारतीय संघाकडून खेळताना वन डेत शतकी खेळी केली. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतही त्याने शतक झळकावले आणि १४ व्या वर्षी ट्वेंटी-२०त ३ शतकं नावावर असलेला तो जगातील पहिला फलंदाज ठरला.

सध्या सुरू असलेल्या १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेतही त्याने वादळी खेळी केली. युएईविरुद्ध त्याने १७१ धावांची विक्रमी खेळी करून दाखवली.. त्यानंतरही तो भारताच्या मुख्य ट्वेंटी-२० संघाकडून खेळण्यासाठी पात्र ठरत नाही... BCCI त्याची सीनियर ट्वेंटी-२० संघात निवड करू शकत नाहीत. कारण, ICC चा नियमच तसा आहे.

'अरे ९० वर आहे, आऊट होईल...'! खेळाडूने स्लेजिंग केली, Vaibhav Suryavanshi चा 'Cute' रिप्लाय; मोडला गिल, AB चा विक्रम... ICC Rule..

आयसीसीने २०२० मध्ये एक नियम आणला आहे. त्यानुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी खेळाडूचे वय किमान १५ वर्ष असायला हवे. वैभव आता १४ वर्षांचा आहे आणि २७ मार्च २०२६ मध्ये तो १५ वर्षांचा होईल. याचा अर्थ त्याला भारताच्या सीनियर संघात पदार्पण करण्यासाठी १०३ दिवस वाट पाहावी लागणार आहे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.