कोल्हापूर : ‘लैंगिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. मानसिक स्थिती सक्षम असेल, तर लैंगिक आरोग्यही चांगले राहते. त्यासाठी संतुलित आहार-विहार करणे हिताचे ठरते,’ असे मत ज्येष्ठ अभिनेते व मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांनी येथे व्यक्त केले.
कोल्हापूर स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ संघटना आणि असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ऑब्स्टेट्रिक अॅण्ड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय लैंगिक शास्त्रावरील वैद्यकीय परिषदेच्या सांगता समारंभात ते बोलत होते.
Kolhapur News : महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील तक्रारींसाठी २४ तास टोलफ्री क्रमांक; रुग्णांच्या आवाजाला मिळणार थेट न्यायस्त्रीरोग व प्रसूती संघटनेच्या वतीने आयोजित दोनदिवसीय राज्यस्तरीय लैंगिक शास्त्रावर आधारित वैद्यकीय परिषदेचा समारोप झाला. लैंगिक आरोग्यविषयक समाजात पसरलेले गैरसमज, चुकीच्या धारणा, भीती व मिथके दूर करून वैज्ञानिक, समुपदेशनात्मक आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून तज्ज्ञांशी खुला संवाद साधण्यावर या परिषदेत भर देण्यात आला.
या चर्चासत्रात डॉ. मानसी जैन, डॉ. प्रसन्न गद्रे, योगतज्ज्ञ देवयानी एस., निरंजन मेढेकर, डॉ. संदीप पाटील आणि डॉ. मदन कांबळे यांनी सहभाग घेतला. समाजामध्ये लैंगिकतेबाबत नकारात्मकता पसरलेली आहे.
Kolhapur Fox Attack : चार शेतकऱ्यांवर हल्ला करून कोल्हा पसार; चुये परिसरात भीतीचं सावट कायमत्यामुळे नव्या पिढीला योग्य लैंगिक शिक्षण देणे आवश्यक आहे. पालकांनी याची सुरुवात स्वतःपासून करणे गरजेचे असून, शिक्षकांची जबाबदारीही मोठी आहे. मुलांमध्ये होणारे शारीरिक व भावनिक बदल, तसेच चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याविषयीचे ज्ञान देणे आवश्यक आहे.
यासाठी मानसोपचारतज्ज्ञ तसेच लैंगिक उपचारतज्ज्ञांकडून योग्य माहिती घेणे महत्त्वाचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. औषधांच्या अतिवापरामुळे लैंगिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे विशेषतः महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत. चिंता, नैराश्य आणि ताणतणाव यांचा लैंगिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे नियमित योग, प्राणायाम करणे आवश्यक आहे. वयानुसार लैंगिक इच्छा कमी होत जाते; मात्र सोशल मीडियावर याबाबत अनेक गैरसमज पसरलेले आहेत. योग्य आहार घेतल्यास शारीरिक तसेच लैंगिक आरोग्य चांगले राहते, असा सूर तज्ज्ञांच्या चर्चेतून व्यक्त झाला.
यावेळी अध्यक्ष डॉ. एम. जे. नागावकर, संघटनेचे सचिव डॉ. रणजित किल्लेदार, डॉ. प्रशांत शहा, डॉ. प्रसाद हलकर्णीकर, डॉ. रूपा नागावकर, डॉ. दादासाहेब पाटील, डॉ. अस्मिता भागवत, डॉ. किशोर केसरकर आणि डॉ. गौरी केणी उपस्थित होते.
विविध विषयांवर मार्गदर्शनदिवसभरातील विविध सत्रांत डॉ. टी. एस. सत्यनारायण राव, डॉ. मानसी जैन, डॉ. विदुला मेस्त्री, डॉ. मदन कांबळे, डॉ. इंद्रनील जाधव, डॉ. गौरी साईप्रसाद आणि योगतज्ज्ञ देवयानी एस. यांनी सखोल मार्गदर्शन केले.
यामध्ये ताण, नैराश्य व चिंतेचा लैंगिक आरोग्यावर होणारा परिणाम, स्त्रीरोग शस्त्रक्रियेनंतरचे लैंगिक आरोग्य, किशोरवयीन अवस्थेतील समवयस्कांचा दबाव व लैंगिक जोखीम, वैवाहिक जीवनातील कलहाचा लैंगिक संबंधांवर होणारा परिणाम, कर्करोगावर उपचार घेत असलेल्या महिलांमधील लैंगिक समस्या, लैंगिक आरोग्यात योग व सजगतेचे महत्त्व, तसेच सामान्य स्त्रीरोगविषयक स्थिती आणि बिघडलेले लैंगिक कार्य, या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.