तिला वाटलं नवरा लाजाळू आहे… पण बॅगेत कंडोम आणि 500 हून अधिक तरुणींसोबत… अभिनेत्रींचाही समावेश; सर्वच हादरले
GH News December 16, 2025 11:11 PM

पती आणि पत्नीचे नाते हे विश्वासावर टीकलेले असते. यात दोघेही एकमेकांच्या प्रती प्रामाणिक असतील तर हे नाते आणखीनच घट्ट होते. परंतू दोघांपैकी एकानेही विश्वास गमावला तर या नात्याच्या अस्तित्वावरच प्रश्न चिन्हं निर्माण होते. असाच एक प्रकार घडला आहे.तिच्या पतीवर तिचे अतोनात प्रेम आणि विश्वास होता. परंतू तरीही पतीने विश्वास घात केला. त्यामुळे व्यतिथ झालेल्या या महिलेने जे केले ते अधिक धक्कादायक होते.

जपान येथे एका महिलेच्या पतीचे पाचशेहून अधिक अफेअर होती. तिच्या पतीचे नाते अनेक एडल्ट चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री आणि एस्कॉर्ट सर्व्हीस देणाऱ्या महिलांशी होते. पत्नीने पतीच्या हा कृत्यांना जगासमोर आणण्यासाठी जपानी मांगा ( एक सचित्र कॉमिक्स बुक ) द्वारे जगाच्या समोर आणले.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या बातमीनुसार महिलेच्या मुलगा एका खूपच दुर्लभ आजाराने पीडीत होता. तिने एकट्याने या मुलाचे पालनपोषण केले. आपल्या कठोर जीवनाची कहाणी आणि पतीच्या बेवफाईला तिने एका पुस्तकाचे रुप देण्याचा निर्णय घेतला.

पती बेवफाई आणि मुलाचे आजारपण

महिलेच्या या धाडसी पावलाने अनेक सिंगल मदरची हिंमत वाढली असून त्यांना त्यांच्या पायावर उभे रहाण्यासाठी प्रेरित केले आहे. जपानी वृत्तपत्र शुकान बंशुन यांच्या बातमीनुसार नेमु कुसानो हीने एका मित्राच्या माध्यमातून ओळख झाल्याने तिच्या पतीशी लग्न केले होते. पती खूपच लाजाळू असल्याचे मानत तिने त्याच्यावर विश्वास ठेवला. तिला वाटले की तो तिला कधीच धोका देणार नाही. तिच्या मुलगा एक दुर्मिळ आजार घेऊनच जन्माला आहे. जगभरात तीसहून कमी लोक या आजाराने ग्रस्त आहेत.

पतीच्या बॅगेस सापडले कंडोम आणि वायग्रा

पती नोकरीमुळे घरी अनेक तास नसायचा त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत कुसानो हीने तिच्या बाळाचे एकट्याने पालनपोषण केले. मात्र एकदा पतीच्या बॅगेत कंडोम आणि वायग्रा सापडल्याने तिचा सर्व विश्वास तुटला. तसेच पतीच्या फोनवर एका डेटींग ऐपशी संदिग्ध नोटीफिकेशन देखील आढळले.

पतीने दावा केला की त्यांचे अफेअर त्याच्या कामाच्या तणावाशी संबंधित होते. पतीला या प्रेम संबंधाचा कोणताही पश्चाताप नव्हता. पती म्हणाला मी तणावाला बाहेरच सांभाळतो घरी आणत नाही.

पत्नीला सापडले 520 अफेयर्सचे पुरावे

हे सर्व ऐकून रागाने लालबुंद झालेल्या कुसानो हिने पतीच्या फोन चॅट आणि सर्व पुराव्यांना जमा केले. एस्कॉर्ट मुलींपासून एडल्ट चित्रपटातील अभिनेत्रींशी संबंध असे एकून ५२० अफेअरचा तिने पर्दाफाश केला.

कुसानो हीने सांगितले की सुरुवातीला तिला बदला घेण्याची इच्छा होती. परंतू नंतर तिला समजले की पतीच्या विरोधात कारवाई केल्याने तिच्या मुलाला नुकसान पोहचू शकते. त्यानंतर कुसानो तिच्या पतीला डॉक्टरकडे घेऊन गेली. त्यात डॉक्टरांनी तो सेक्स एडिक्शन ग्रसित असल्याचे सांगितले. तिच्या पतीला ही सवय शाळेपासून असल्याचे तिला समजले. तिने योगा जर्नलला सांगितले की सेक्स एडिक्शनच्या संदर्भात माहिती मिळाल्याने तिला यापासून सुटका मिळवण्याची मदत मिळाली. अखेर मुलासाठी तिने पतीशी संवाद करण्याचा प्रयत्न केला. एवढेच काय त्याच्या सोबत ती थेरपीला देखील गेली.

आता वेगळी राहून आणि आपल्या मुलाचे एकट्याने पालन करणारी कुसानो हीने जपानी मांगा कलाकार पिरोयो अराई यांच्या मदतीने तिची कहाणी एका कॉमिक ( सचित्र पुस्तक ) मध्ये आणली. कलेच्या माध्यमातून स्वत:ला भावनिकरित्या गुंतवण्याचा प्रयत्न करत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.