Made in Maharashtra Germany Jobs: राज्यात रोजगाराची संधी कमी होत असताना, महाराष्ट्रातील तरुणांसाठी उपलब्ध असलेली एक मोठी आंतरराष्ट्रीय संधी सरकारच्या निष्क्रियतेमुळे वाया गेल्याचे समोर आले आहे. जर्मनीमध्ये कुशल मनुष्यबळाची मोठी मागणी असतानाही राज्य सरकारकडून आवश्यक पावले उचलली न गेल्याने तब्बल २० हजार विद्यार्थ्यांना परदेशात नोकरी मिळण्याची संधी गमवावी लागली आहे.
२०२४ मध्ये महाराष्ट्र आणि जर्मनी यांच्यात विविध क्षेत्रांतील कुशल मनुष्यबळ पाठ्वण्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना आवश्यक प्रशिक्षण देऊन जर्मनीत रोजगारासाठी पाठवण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष अंलबजावणीअभावी ही योजना कागदावरच राहिली.
NASA Scientist Salary: NASA मध्ये संशोधन शास्त्रज्ञाला किती पगार मिळतो; जाणून घ्या सुविधा काय आहेत?या उपक्रमांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण, कौशल्य विकास, उद्योग, कृषी तसेच वैद्यकीय शिक्षण विभागांमार्फत मनुष्यबळ तयार करण्यात येणार होते. यासाठी सुमारे ७० कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला होता. तरीही वर्षभरात एकाही विद्यार्थ्याला जर्मनीत नोकरीसाठी पाठवण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे.
एकीकडे राज्यात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होत असताना, परदेशात सहज उपलब्ध होऊ शकणाऱ्या नोकऱ्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर जर्मनीतील वरिष्ठ मंत्री, प्रशासकीय अधिकारी आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिनिधी आज मुंबईत येऊन राज्य सरकारशी चर्चा करणार आहे.
Shani Dosha: शनि दोष कमी होईल; फक्त हनुमान मंदिरात गेल्यावर ही गोष्ट लक्षात ठेवा!विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा यासाठी शासकीय मान्यताप्राप्त रिक्रुटमेंट एजंट्सनी सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर अद्याप राज्य सरकारकडून कोणतीही स्पष्ट भूमिका मांडण्यात आलेली नाही.
जर्मनीसारख्या विकसित देशात महाराष्ट्रातील तरुणांसाठी रोजगाराची दारे खुली असताना, शासनाच्या उदासीनतेमुळे ही सुवर्णसंधी का दवडली गेली, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.