Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या, एका क्लिकवर
esakal December 19, 2025 06:45 AM
मुंबईत महाविकास आघाडीसाठी शरद पवार काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार

महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी कायम राहावी यासाठी शिवसेना ठाकरे गट आग्रही आहे. शिवसेना(ठाकरे) आणि मनसे एकत्र महापालिका निवडणुकांना सामोरे जाणार असताना या आघाडीत आता राष्ट्रवादीनेही (शरद पवार) सामील व्हावे यासाठी शिवसेना (ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत आघाडीचा प्रस्ताव देण्यात आला असून काँग्रेसने आघाडीत सामील व्हावे यासाठी स्वत: शरद पवार काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

मनपा निवडणुकीसाठी संजय राऊत अन् शरद पवारांमध्ये चर्चा

मुंबईसह महापालिका निवडणुकीसाठी संजय राऊत आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, शरद पवारांनी आधी मनसे आणि ठाकरे गटातील जागा वाटपाची चर्चा अंतिम करा अशा सूचना दिल्याचे सांगितले जात आहे.

निलंबित कर्मचाऱ्यांनी तातडीने स्पष्टीकरण द्यावे - बावनकुळे

नागपूर अधिवेशनादरम्यान निलंबित करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने आपले स्पष्टीकरण सादर केल्यावर निलंबन मागे घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. मात्र जाणीवपूर्वक केलेल्या चुकीला माफी मिळणार नाही असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सर्व संघटनांनी आपले आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन देखील त्यांनी केले.

‘जी राम जी’वर लोकसभेची मोहोर

लोकसभेमध्ये बहुचर्चित ‘विकसित भारत-जी राम जी’ विधेयक मंजुरीवरून आज प्रचंड गदारोळ झाला. हे विधेयक संसदीय स्थायी समितीकडे पाठविण्यासाठी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करून त्याच्या प्रती फाडून टाकत कागदपत्रे हवेमध्ये भिरकावली. या गोंधळातच विधेयक आवाजी मतदानाने संमत करण्यात आले. ‘मनरेगा’तील त्रुटी दूर करण्यासाठी हे विधेयक आणले असल्याचे ग्रामविकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले. हे विधेयक ग्रामीण भागात रोजगार वाढविणारे असून संपूर्ण विकसित गावे बनविण्याचे सरकारचे उद्दीष्ट असल्याचाही दावा त्यांनी केला. काही अतिउत्साही खासदार हे लोकसभा महासचिवांच्या आसनाजवळील मेजावर दोन्ही बाजूंना उभे राहिल्याचा प्रकार घडला.

दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास शासनाचे प्रोत्साहन

दिव्यांग अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या असून, अनुदानाच्या रकमेत वाढ करून योजना अधिक प्रभावी करण्यात आली असल्याची माहिती दिव्यांग कल्याण विभागाने शासन आदेश प्रसिद्ध करून दिली आहे.

Live: अंबाजोगाई बीड रोडवर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात दुचाकीस्वार जागेवर ठार

बीडच्या अंबाजोगाई बीड रोड लोखंडी सावरगावच्या पुढे कळंब चौक या वळणावर भिषण अपघात झाला असून ठिकाणी दुचाकी व ट्रकचा वळणावर भिषण अपघात झालेला असून यामध्ये दुचाकी स्वर जागीच ठार झाला आहे मयत व्यक्ती बीडच्या आष्टी शहरातील असुन सोमनाथ पोपट पवार असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

Live: केडीएमसीच्या निवडणुकीसाठी नऊ ठिकाणी मतमोजणी

- कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी पालिका प्रशासन सज्ज झाले असून पालिकेच्या ३१ पॅनल मधील निवडणूकी साठी १५८३ मतदान केंद्रे असणार आहेत.

Live: मुंबईत काँग्रेसचा ‘वोट चोरी’ घोटाळ्याचा आरोप

आगामी बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मतदार याद्यांमध्ये मोठ्या अनियमितता असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तीन वेळा नगरसेविका राहिलेल्या शीतल म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत ‘अदृश्य इमारती’, अस्तित्वात नसलेले मतदार आणि कोरे EPIC कार्ड उघड केले. आयसी कॉलनीतील एका न अस्तित्वात असलेल्या इमारतीत १४३ मतदार नोंद असल्याचा दावा त्यांनी केला. ड्राफ्ट यादीत हरकती नोंदवूनही अंतिम यादीत दुरुस्ती न झाल्याने निवडणूक आयोगावर त्यांनी ताशेरे ओढले.

Live : साई चरणी २० लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; साईभक्ताचा संस्थानकडून सन्मान

मध्यप्रदेशातील हरदासपूर येथील साईभक्त तेज बहादुर सिंह यांनी साईबाबांच्या चरणी सुमारे २०० ग्रॅम वजनाचा, आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला आहे. या मुकुटाची अंदाजे किंमत सुमारे २० लाख रुपये आहे. या दानाबद्दल साईबाबा संस्थानच्या वतीने साईभक्त तेज बहादुर सिंह यांचा सत्कार करण्यात आला.

Raosaheb Danve Live : कायद्यापुढे कोणीही मोठं नाही; आमच्या सरकारने हे प्रत्यक्ष दाखवून दिलं – रावसाहेब दानवे

कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही, हे आमच्या सरकारने कृतीतून दाखवून दिलं आहे. आमचा पक्ष नेहमीच कायद्याचं पालन करणारा आहे. यापूर्वी नवाब मलिक तुरुंगात गेले, तरी त्यांनी राजीनामा दिला नव्हता. केजरीवाल यांनीही पद सोडले नव्हते. मात्र आमच्या सरकारने कायद्यापुढे कोणीही मोठं नाही, हे स्पष्टपणे सिद्ध केलं आहे, असे भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटले.

Nashik Live : कोकाटेंचा राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला; अटक करण्यासाठी नाशिक पोलिस मुंबईला रवाना

कोकाटे यांचा राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

कोकाटेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलिस मुंबईला रवाना

Nashik Live : नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाला बॉम्ब धमकी; बॉम्बशोध पथक व डॉग स्कॉडकडून कसून तपास

नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. धमकीचा ई-मेल प्राप्त होताच संबंधित यंत्रणा तत्काळ सतर्क झाली. सुरक्षेच्या दृष्टीने बॉम्बशोध पथक जिल्हा न्यायालय परिसरात दाखल झाले असून सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे. यासोबतच डॉग स्कॉडमार्फतही न्यायालय परिसराची सखोल तपासणी करण्यात येत आहे.

Pune Live: भोरमध्ये रात्रीच्या सुमारास गॅस लीकमुळे एका घराला भीषण आग लागल्याची घटना

पुण्याच्या भोर तालुक्यातील हातवे बुद्रुक येथे रात्रीच्या सुमारास एका घराला गॅस लीकमुळे भीषण आग लागल्याची घटना.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही

मात्र या आगीत सुनीता नंदकुमार गुरव यांचं संपूर्ण घर जळून खाक झाल्याने मोठं नुकसान झालयं

या आगीत घरातील टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, अन्नधान्य, रोख रक्कम, वॉटर प्युरिफायर, सोलर पॅनल, पंखे, मोबाईल, सोफा, सोन्या-चांदीचे दागिने तसेच इतर जीवनावश्यक साहित्य पूर्णपणे नष्ट झाले आहे.

घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून एकूण १५ ते १८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद पंचनाम्यात करण्यात आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, घरामध्ये अचानक गॅस लीक झाल्याने आग भडकली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले.

आगीची माहिती मिळताच भोर तसेच पुण्याहून अग्निशमन वाहनांना पाचारण करण्यात आले. मात्र, तोपर्यंत घर पूर्णपणे जळून खाक झाले होते.

आगीत संपूर्ण घर जळून खाक झाल्याने गुरव कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे. तातडीने या कुटुंबाला मदत मिळावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.

Vardha Live: वर्धेच्या देवळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा

- देवळी नगरपालिकेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

- देवळीत भाजपा, काँग्रेस व अपक्ष मध्ये आहे जोरदार लढत

- भाजपाकडून माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी आहे रिंगणात

- मागील 35 वर्षांपासून या नगरपालिकेवर रामदास तडस यांचे आहे वर्चस्व

- वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी भाजपाकडून जोरदार प्रचार

- पाच वाजता मुख्यमंत्री देवळी शहरात होणार दाखल

- मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष

Nanded Live : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेडच्या मुखेडमध्ये जाहीर सभेसाठी उपस्थित; नगरपालिकेच्या प्रचारासाठी सभा

नांदेडच्या मुखेडमध्ये भाजपाच्या प्रचाराचा वेग वाढत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ थोड्याच वेळात जाहीर सभा घेतली.

Mumbai Live: निवडणूक निकाल जवळ येताच शिंदे गट व भाजपाची धाकधूक वाढली; काँग्रेस शहराध्यक्ष दत्ता काकस यांची टीका

निवडणूक निकाल जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये धाकधूक वाढल्याचा आरोप काँग्रेस शहराध्यक्ष दत्ता काकस यांनी केला आहे. निकाल जवळ आल्याने काही नेते घाबरून आजारी पडल्याची उपरोधिक टीकाही त्यांनी केली.

Pune Live Update: पुण्यात 25 ई डबल डेकर बस

पुण्यात 25 इलेक्ट्रिक डबल डेकर बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. बुधवारी पीएमपीने 25 डबल डेकर बससाठी निविदा जाहीर केली आहे. त्यामुळे नवीन वर्षात पुण्यातील रस्त्यांवर डबल डेकर बस धावताना दिसतील.

Nashik Liveupdate : नाशिकमध्ये चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चा

माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद धनंजय मुंडे यांना देण्याच्या चर्चेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी बीडमध्ये आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, सुप्रिया ताईंना उपोषणाची वेळ येऊ देणार नाही.

AkolaLiveupdate : धनंजय मुंडे यांना मंत्रीपद दिल्यास आमरण उपोषण करू, खासदार सुप्रिया सुळे यांचा इशारा

माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद धनंजय मुंडे यांना देण्याच्या चर्चा सुरू आहेत. जर असं झालं तर बीडमध्ये जाऊन आमरण उपोषण करू, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल मिटकरी बोलत होते. सुप्रिया ताईंना उपोषणाची वेळ येऊ देणार नाही, असं त्यांनी सांगितलं.

Solapur Live : सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोचा भीषण अपघात

सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बावी पाटीजवळ शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोचा भीषण अपघात

अपघातात दोन विद्यार्थी गंभीर जखमी, टेम्पो चालकाच्या डोक्याला मार; इतर विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली

आरोग्य शिबिरासाठी धाराशिवकडे निघालेल्या निवासी मुकबधिर विद्यालय, उमरगा येथील ३५ विद्यार्थी, एक शिक्षक व चालक टेम्पोमध्ये प्रवास करत होते

Ahilyanagar Live : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाथर्डी मध्ये दाखल

नगरपरिषदेच्या निवडणुकी संदर्भात उमेदवाराच्या प्रचारार्थ सभेला उपस्थिती

जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिका राजळे देखील उपस्थित

Pune Live : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी साखर आयुक्तांच्या भेटीला

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी पुण्यात साखर आयुक्तांच्या भेटीला

थकित एफआरपी संदर्भात राजू शेट्टी यांनी घेतली साखर आयुक्त संजय कोलते यांची घेतली भेट

भेटीनंतर राजू शेट्टी थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार

Mumbai : मुंबईतील बांद्रा न्यायालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी

Mumbai : मुंबईतील बांद्रा न्यायालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबईतील बांद्रा न्यायालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर एकच खळबळ उडाली.

सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने संपूर्ण कोर्ट परिसर खाली करण्यात आला.

माहिती मिळताच बॉम्ब निरोधक पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

Pune : काँग्रेस भवन मध्ये इच्छुकांची मोठी गर्दी

काँग्रेसच्या कालपासून सुरू आहेत मुलाखती

भाजप नंतर काँग्रेसकडे इच्छुकांची मोठी गर्दी

काँग्रेस भवन बाहेर छावणीचे स्वरूप

महाविकास आघाडी मधून लढावी अशी राष्ट्रवादीची इच्छा असली तरी काँग्रेस कार्यकर्त्यांची ही इच्छा महाविकास आघाडी म्हणूनच लढावं

Kolhapur Circuit Bench : कोल्हापूर खंडपीठाच्या स्थापनेला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ १८ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झाले,

कोल्हापूर हे मुंबई उच्च न्यायालयाचे चौथे कार्यकारी खंडपीठ बनले आहे.

यावर कोल्हापूर खंडपीठाच्या स्थापनेला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती.

सुप्रीप कोर्टाने कोल्हापूर खंडपीठाच्या स्थापनेला आव्हान देणारी याचिका फेटाळली आहे.

Nagpur Live: नागपूर जिल्हा सत्र न्यायालय बॉम्बने उडविण्याच्या धमकीचा मेल

नागपूर जिल्हा सत्र न्यायालय बॉम्बने उडविण्याच्या धमकीचा मेल

जिल्हा सत्र न्यायालयाच्या मेलआयडी वर मेल आल्याची माहिती

सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून सत्र न्यायालय परिसरात सुरक्षेत वाढ..

Nashik : महापालिकेसाठी शिवसेना शिंदे गटाच्या आजपासून मुलाखती

नाशिक महापालिकेसाठी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती - शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, माजी खासदार हेमंत गोडसे, उपनेते अजय बोरस्ते यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित होणार मुलाखती - आजपासून ३ दिवस घेण्यात येणार इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती

Sangameshwar News : संगमेश्वरमध्ये कारचा अपघात,चालकाचा जागीच मृत्यू

मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे मुंबईहून गणपतीपुळे येथे जाणाऱ्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य एक प्रवासी किरकोळ जखमी झाला आहे.रस्त्याच्या कडेला संरक्षक म्हणून बांधलेल्या गर्डरवर अपघातग्रस्त ब्रेझा गाडी आदळली आणि तशीच काही फूट पुढे गेल्याने तुटलेला गर्डर गाडीचे इंजिन फोडून मागच्या सीटपर्यंत गेला. त्यात तो चालकाच्या मांडीत घुसल्याने चालक गाडीच्या बाहेर फेकला गेला आणि जागीच ठार झाला.

Nanded : अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होतील - आमदार अमोल मिटकरी

नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी एक नंबरचा पक्ष असेल तर राज्यातील नगरपालिकेच्या सत्ता स्थापनेत राष्ट्रवादी किंग मेकर असेल, अजित दादा लवकरच या राज्याचे मुख्यमंत्री होतील असे विधान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले. नांदेडच्या धर्माबाद येथे राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अमोल मिटकरी यांनी हे विधान केलं आहे. दादा हे मुख्यमंत्री होतील त्याचं कारण दादांना राज्यातील लाडक्या बहिणीचा आशीर्वाद, लाडक्या भावांचा आशीर्वाद,शेतकऱ्यांचा आशीर्वाद,आहे. असे अमोल मिटकरी म्हणाले.

J & K Live :अनंतनागमध्ये सीआरपीएफ जवानाचा हृदयविकाराने मृत्यू

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील मट्टन भागात काल रात्री उशिरा गस्त घालत असताना एका सीआरपीएफ जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

Paithan Live : पैठणमध्ये नगरपरिषदेच्या उमेदवाराच्या घरासमोर जादुटोण्याचा प्रकार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमध्ये नगरपरिषदेच्या उमेदवाराच्या घरासमोर जादुटोण्याचा प्रकार समोर आला आहे.

Ajit Pawar Live : अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात बैठक सुरु

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरु आहे. मुंबई महापालिका निवडणुकी संदर्भात ही बैठक असल्याचे समजते.

Kolhapur News : ‘आप’ आजपासून देणार उमेदवारी अर्ज

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत आपकडून लढण्यास इच्छुक असलेल्यांना गुरुवारपासून (ता. १८) उमेदवारी मागणी अर्ज दिले जाणार आहेत. दोन दिवसानंतर मुलाखती घेण्यात येणार आहेत. आम आदमी पार्टीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. १८ व १९ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी पाचपर्यंत उमेदवारी मागणी अर्ज दिले जाणार आहेत. २० व २१ डिसेंबर रोजी इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. उद्यनगरमधील आप कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी केले.

Actress Shilpa Shetty : शिल्पा शेट्टीच्या मालकीच्या पबवर नियमभंगाचा गुन्हा दाखल

बंगळूर : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या मालकीच्या बंगळूरमधील लक्झरी पबविरुद्ध ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त काळ व्यवसाय चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. दरम्यान, याच ‘बास्टियन’ पबवर बुधवारी प्राप्तिकर विभागाने छापा टाकून तपासणी केली. सेंट मार्क्स रोडवरील ‘बास्टियन’ रेस्टॉरंट-पबमध्ये ११ डिसेंबर रोजी नियमांचे उल्लंघन करून रात्री उशिरापर्यंत पार्टी सुरू असल्याचा आरोप आहे.

प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन, दिल्लीतील निवासस्थानी घेतला अखेरचा श्वास

प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे आज निधन झाले. दिल्ली येथील निवासस्थानी त्यांनी अखेचा श्वास घेतला आहे.

MLA Pradnya Satav : आमदार प्रज्ञा सातव काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन आज भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता!

कळमनुरी (जि.हिंगोली) : काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव या काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आज दिवसभर राजकीय वर्तुळात होती. याबाबत प्रज्ञा सातव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.

Valmik Karad : सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडचा जामीन अर्ज फेटाळला

छत्रपती संभाजीनगर : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. सुशील घोडेस्वार यांनी आज फेटाळला. देशमुख हत्याप्रकरणी बीडच्या सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर वाल्मीक कराडने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. दोनदा सुनावणी झाल्यानंतर बुधवारी पुन्हा तीन तास सुनावणी पार पडली. वाल्मीक कराडतर्फे यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ शिरीष गुप्ते, ॲड. संकेत कुलकर्णी, ॲड. सत्यव्रत जोशी यांनी बाजू मांडली. शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी काम पाहिले. त्यांनी आधीचे अनेक मुद्दे खोडून काढले. त्यांना ॲड. सचिन सलगर यांनी सहकार्य केले. फिर्यादीतर्फे नितीन गवारे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. धनंजय पाटील यांनी सहकार्य केले.

Adv Manikrao Kokate Resigns : ॲड. माणिकराव कोकाटे बनले बिनखात्याचे मंत्री, सर्व खाती घेतली काढून

Latest Marathi Live Updates 18 December 2025 : सदनिका गैरव्यवहारप्रकरणी अडचणीत आलेले राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्याकडील सर्व खाती काढून घेण्यात आली असून, आता ते बिनखात्याचे मंत्री बनले आहेत. कोकाटे यांच्याकडील खाती तूर्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. तसेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. सुशील घोडेस्वार यांनी फेटाळला. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव या काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत प्रज्ञा सातव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.