T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकपसाठी या दिवशी होणार टीम इंडियाची घोषणा, या खेळाडूंना मिळणार संधी!
Tv9 Marathi December 19, 2025 06:45 AM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. त्यामुळे गतविजेता भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. असं असताना या स्पर्धेसाठी आता फारच कमी वेळ उरला आहे. त्यामुळे भारतीय संघात कोण खेळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. संजू सॅमसन असेल की शुबमन गिल असे प्रश्न क्रीडाप्रेमींना पडले आहे. रिपोर्टनुसार, टी20 वर्ल्डकप 2026 साठी भारतीय संघाची घोषणा पुढच्या 48 तासात होऊ शतके. टीम इंडियाचे निवडकर्ते शनिवारी टी20 वर्ल्डकपच्या दृष्टीने संघांची घोषणा करण्याची शक्यता आहे. खरं तर निवडकर्ते न्यूझीलंडविरूद्धच्या टी20 मालिकेसाठी संघ निवडणार आहेत. हाच संघ टी20 वर्ल्डकप स्पर्धेत उतरेल असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे या संघात कोणाची निवड होईल आणि कोणाला बाहेर केलं जाईल हे स्पष्ट होणार आहे.

टी20 वर्ल्डकपसाठी संघाची निवड खरंच आधीच ठरली आहे. कारण ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून संघात फार काही बदल केलेला नाही. हाच संघ दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळला होता. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही हात संघ खेळणार यात काही शंका नाही. पण या दरम्यान एखादा खेळाडू जखमी झाला तर बदल होण्याची शक्यता आहे. अन्यथा संघात कोणताच बदल होईल असं वाटत नाही. टी20 वर्ल्डकप संघाची धुरा सूर्यकुमारकडे असेल. खराब फॉर्मात असूनही शुबमन गिल संघात असेल. अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि जितेश शर्माही या संघाचा भाग असतील.

अष्टपैलू हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल संघात असतील. कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरूण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग आणि हार्षित राणा यांना संघात जागा मिळेल. दुसरीकडे, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत चमकदार कामगिरी करणारे इशान किशन आणि यशस्वी जयस्वाल राखीव खेळाडू म्हणून असतील. या यादीत रिंकु सिंहचं नावही असेल.

भारताचा टी20 वर्ल्डकपसाठी संभाव्य संघ: अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, जितेश शर्मा, अक्षर पटेल, शिवम दुबे, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर आणि हर्षित राणा असा संघ असेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.