Aishwarya Rai- Abhishek Bachchan : घटस्फोटाच्या अफवा फेटाळल्यानंतर ऐश्वर्या-अभिषेक दिसले एकत्र, लेक आराध्यासाठी थेट..
Tv9 Marathi December 19, 2025 03:45 PM

कुटंबातील खटके, नात्यातले तणाव आणि अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या घटस्फोटाच्या बातम्या… नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan)याने सर्व गोष्टी फेटाळून लावत घटस्फोटाच्या अफवा निराधार असल्याचे स्पष्ट केले होते. पत्नी, अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्याबद्दलच्या नात्याबद्दलही त्याने अनेक गोष्टी स्पष्ट केल्याने, त्यांच्या नात्याबद्दलच्या अफवांना पूर्णविराम दिला. घटस्फोटाच्या अफवा फेटाळून लावल्यावर आता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हे बऱ्याच दिवसांनी सार्वजनिक रित्या एकत्र दिसले आहेत. त्यांचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

गुरूवारी धीरूभाई अंबानी इंटरनेशनल स्कूलचं ॲन्युअल फंक्शन पार पडलं, तेव्हा लाडकी लेक आराध्या हिच्यासाठी बच्चन कुटुंब उपस्थित होतं. आराध्याचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी तिचे पालक, अर्थात ऐश्वर्या आणि अभिषेक तर आले होते, पण त्यांच्यासह तिचे लाडके आजोबा, अभिनेते अमिताभ बच्चन तसेच आराध्याची आजी, ऐश्वर्याची आई वृंदा राय यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या सोहळयाचे बरेच फोटो सोशल मीडियावर आले असून काळ्या रंगाचा पंजाबी सूट, मोकळे सोडलेले केस अशा अटायरमध्ये ऐश्वर्या सुरेख दुसत होती. तर अबिषकने कॅज्युअल कपडे घातले होते. कार्यक्रमस्थळी दोघांनी एंट्री केली, तेव्हाचा व्हिडीओही समोर आला आहे. त्यानंतर मागून येणाऱ्या सासूबाईंना, ऐश्वर्याच्या आईलाही अभिषेकने नीट चालत येण्यास मदत केली.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

घटस्फोटाच्या वृत्तावर बोलल्यानंतर अभिषेक-ऐश्वर्या पहिल्यांदा झाले स्पॉट

काही दिवसांपूर्वी अभिषेकने घटस्फोटाच्या अटकळांना थेट नकार दिला होता आणि या चर्चा पूर्णपणे खोट्या असल्याचे म्हटले होते, त्यानंतर अभिषेक आणि ऐश्वर्याची सार्वजनिक कार्यक्रमात ही पहिलीच उपस्थिती आहे. पीपिंग मूनला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अभिषेक अनेक विषयांवर बोलला, तो म्हणाला, “जर तुम्ही सार्वजनिक व्यक्ती असाल तर लोक प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर अंदाज लावले जातात. लिहिलेले सर्व मूर्खपणा, पूर्णपणे खोटे आहे. त्यात काहीही तथ्य नाही; ते फक्त खोटं आहे आणि जाणूनबुजून दुखावणारं आहे” असं सांगत अभिषेकने घटस्फोटाच्या अफवा निराधार असल्याचे नमूद केलं.

या अफवा त्याच्या लग्नानंतर नव्हे तर लग्नापूर्वीही पसरत होत्या असेही अभिषेक बच्चनने म्हटले. तो म्हणाला, “आमचे लग्न होण्यापूर्वी लोक आमच्या लग्नाच्या तारखांबद्दल अंदाज लावत होते. तर आम्ही लग्न केल्यानंतर, लोक आमच्या विभक्त होण्याच्या तारखा आखू लागले. हे सर्व मूर्खपणाचे आहे. तिला (ऐश्वर्या) माझं सत्य माहित आहे, मला तिचं सत्य माहित आहे. आम्ही एका प्रेमळ कुटुंबात राहतो, आणि तेच सगळ्यात महत्वाचं आहे” असंही अभिषेक म्हणाला होता.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.