बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेने चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या काळातील तिचे अनुभव शेअर केले.
अभिनेत्रीला सुरुवातीच्या काळात मानसिक छळाचा सामना करावा लागला.
मात्र आता राधिका आपटे साऊथ आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिने साऊथ, मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच ती वेब सीरिजचा प्रसिद्ध चेहरा आहे. मात्र तिला सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. तिने एका मिडिया मुलाखतीत आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळाविषयी सांगितले. अभिनेत्री नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.
View this post on Instagram
राधिका आपटेने मुलाखतीत सांगितल्यानुसार, तिने मोठ्या लोकांनी बनवलेल्या हिंदी चित्रपटांपासून स्वतःला दूर ठेवले. तथापि, 2000 च्या दशकाच्या उत्तरार्धात तिने ज्या दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केले होते, त्यातही तिला लिंगभेदाचा सामना करावा लागला. राधिका म्हणते की, "मी अशा अनेक मोठ्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेले नाही जिथे अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. माझ्याकडे काही ऑफर होत्या आणि मी त्यांना भेटायला गेले होते. जेव्हा मला कळले तेव्हा मी म्हणाले, 'मी त्यांच्यासोबत कधीही काम करणार नाही... हे खूप वाईट लोक आहेत. खूप मोठे लोक. मी नावे सांगितली तर तुम्ही म्हणाल, 'काय?' पण मी त्यांच्यासोबत काम केले नाही. मग मी काही साऊथ चित्रपट केले, कारण मला पैशांचीगरज होती."
राधिका पुढे म्हणाली, "मी ज्या काही चित्रपटांमध्ये काम केले होते त्यांच्या सेटवर मला अनेक अडचणी आल्या. मला आठवते की एकदा मी सेटवर एकटीच महिला होते. आम्ही एका छोट्या शहरात शूटिंग करत होतो. त्यांना माझ्या कंबरेवर आणि स्तनांवर अधिक पॅडिंग लावायचे होते. ते म्हणाले, 'अम्मा, जास्त पॅडिंग.' मी म्हणाले, 'आणखी किती पॅडिंग?' तुम्ही एखाद्याला किती गुबगुबीत बनवू शकता?' मी एकटीच महिला होते. माझा कोणी मॅनेजर नव्हता. एजंट नव्हता. माझ्या टीममध्ये सर्व पुरुषहोते. कारण त्यांनी मला भूमिका दिली होती. ते म्हणाले, 'तुम्हाला तुमची स्वतःची टीम आणण्याची परवानगी नाही..."
View this post on Instagram
राधिकाने सांगितल्यानुसार, सेटवर महिलांबद्दल अश्लील विनोद केले जायचे. त्यांच्या शरीरावर कमेंट्स केल्या जायचा. तुमचे शरीर कसे असायला हवे हे सांगताना आजूबाजूला एकही महिला नसतात. यासर्वांमुळे राधिकाचे मानसिक आरोग्य बिघडले. ती म्हणते की, "सहसा मी खूप स्पष्टवक्ती आणि शूर असते. तरीही त्या दिवसांची आठवण येताच हृदय धडधडते. मला पुन्हा कधीही अशा परिस्थितीत राहायचे नाही, कारण मी रडेन. ते खरोखरच क्लेशकारक होते. कोणत्याही महिलेने अशा परिस्थितीत राहू नये. "
अभिनेत्रीने स्पष्ट केले की, ती या संस्कृतीसाठी फक्त पुरुषांना दोष देत नाही. ती म्हणाली, "बऱ्याच महिला मोठ्या पदांवर आहेत ज्या बदल घडवून आणू शकतात, परंतु त्या तसे करत नाहीत आणि मला ते खूप त्रासदायक वाटते." नुकताच अभिनेत्रीचा रात अकेली है: द बंसल मर्डर्स (Raat Akeli Hai: The Bansal Murders) चित्रपट 19 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.
Marathi Actress : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, आमिर खानच्या सिनेमात वर्णी