टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन भारत आणि श्रीलंकेत करण्यात आलं आहे. वर्ल्डकप स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तसेच अंतिम सामना 8 मार्चला होणार आहे. भारत भूमीत हा वर्ल्डकप होणार असल्याने टीम इंडिया जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. अशा स्थितीत गेल्या दोन वर्षांपासून टीम इंडियात बरेच बदल केले गेले. त्यानंतर या स्पर्धेपूर्वी 15 जणांचा संघ निश्चित करण्यात आला आहे. पण संघ जाहीर करताना काही मोठे बदल करण्यात आले आहेत. यात दिग्गज खेळाडूंचा पत्ता कापला गेला. तर काही खेळाडूंची अनपेक्षितरित्या एन्ट्री झाली आहे. निवड समितीच्या पाच निर्णयामुळे संघाचं चित्र बदललं आहे. चला जाणून घेऊयात निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यानी काय निर्णय घेतले आहेत ते..
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतून इशान किशनचं टीम इंडियात कमबॅक झालं आहे. गेली दोन वर्षे टीम इंडियात जागा मिळवण्यासाठी इशान किशन धडपड करत होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर इशान किशनला संघात स्थान मिळालं आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याचा विचार करणं निवड समितीला भाग होतं.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून टीम इंडियाच्या टी20 संघाची धुरा शुबमन गिलच्या खांद्यावर दिली होती. पण त्याला टी20 वर्ल्डकप संघात स्थान मिळालं नाही. त्यामुळे त्याच्याकडचं कर्णधारपद अक्षर पटेलकडे सोपवण्यात आलं आहे.
मागच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या ऋषभ पंतला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मागच्या स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी केली होती. तसेच संघाला चॅम्पियन करण्यात योग्य भूमिका बजावली होती. मात्र यावेळी त्याला संघातून वगळण्यात आहे.
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज भारताच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळतो. पण टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून त्याला वगळण्यात आलं आहे. मोहम्मद सिराज टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत टीम इंडियाचा भाग होता.
हार्षित राणाला साधारण कामगिरी असूनही टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत स्थान मिळालं आहे. त्याने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या 3 टी20 सामन्यात फक्त 3 विकेट घेतल्या होत्या. इतकंच काय तर दुसर्या सामन्यात एकही विकेट मिळाली नव्हती.