टी२० वर्ल्ड कपसाठी Shubham Gill ची जागा घेतली आता IPL फ्रँचायझी काढणार वचपा? 'त्या' Video नंतर चर्चा
esakal December 23, 2025 11:45 AM
  • भारतीय टी२० वर्ल्ड कप २०२६ साठी शुभमन गिलला संघातून वगळण्यात आले असून अक्षर पटेलला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

  • मात्र, आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या अक्षरला कर्णधारपद गमवावे लागण्याची शक्यता आहे.

  • दिल्ली कॅपिटल्स केएल राहुलला कर्णधार बनवण्याची चर्चा आहे.

दोन दिवसांपूर्वीच टी२० वर्ल्ड कप २०२६ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यावेळी शुभमन गिलला संघातून वगळण्यात आल्याने अक्षर पटेलकडे पुन्हा उपकर्णधारपद सोपवण्यात आले.

त्याच्याकडे ही मोठी जबाबदारी जरी सोपवण्यात येणार असली, तरी त्याला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अक्षर पटेलला (Axar Patel) त्याचे आयपीएलमधील कर्णधारपद गमवावे लागण्याची शक्यता आहे.

पंजाब किंग्सच्या 'डिल' वर आर अश्विन खूपच प्रभावित; म्हणतोय, हा खेळाडू IPL 2026 मध्ये घुमशान घालणार

अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) आयपीएलमध्ये खेळतो. त्याला दिल्लीने आयपीएल २०२५ साठी कर्णधारही केले होते. मात्र आता आयपीएलच्या नव्या हंगामात त्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्याची चर्चा आहे. तसेच काही रिपोर्ट्सनुसार अक्षर पटेलच्या ऐवजी केएल राहुलकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली जाऊ शकते. तसेच अक्षर केवळ खेळाडू म्हणून खेळू शकतो.

आयपीएल २०२५ साठीही केएल राहुलला(KL Rahul) कर्णधारपदाबाबत विचारण्यात आले होते, पण त्याने त्यासाठी नकार दिला होता. त्यावेळी त्याची पत्नी त्यांच्या मुलीला जन्म देणार होती. त्यामुळे त्याने नेतृत्वासाठी नकार दिला होता. त्यानंतर अक्षर पटेलला कर्णधार करण्यात आले होते.

अक्षरच्या नेतृत्वात दिल्लीने सुरुवात चांगली केली होती, पण नंतर त्यांची कामगिरी ढासळली होती. दिल्लीने १४ सामन्यांपैकी ७ सामने जिंकले. ते गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर राहिले होते.

IPL 2026: सॅमसनमुळे ऋतुराजचे सलामीचे स्थान गेले...! अश्विनने निवडलेल्या CSK च्या प्लेइंग १२ मध्ये दिसेल नवीन ओपनिंग जोडी

दरम्यान, या चर्चेला उधाण आले आहे कारण दिल्लीने सोमवारी एक व्हिडिओ शेअर केला असून मोठी घोषणा करण्यात येणार असल्याचे त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे. मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता ही घोषणा केली जाईल, अशी माहिती दिल्लीने दिली आहे.

आता नेमकी ही घोषणा कशाबाबत आहे, हे दिल्लीने स्पष्ट केलेलं नाही. मात्र या व्हिडिओनंतर केएल राहुलला कर्णधार करण्याबाबत ही घोषणा असू शकते, असे तर्क लावले जात आहेत.

केएल राहुलला नेतृत्वाचा अनुभव आहे. त्याने भारतीय संघाचेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेतृत्व केले आहे. तसेच त्याने पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स संघाचेही आयपीएलमध्ये नेतृत्व केले आहे. लखनौने २०२२ आणि २०२३ मध्ये प्लेऑफमध्येही प्रवेश केला होता.

जेमिमाह रोड्रिग्सला कर्णधारपद

दरम्यान, व्हिडिओचा दुसरा तर्क असाही लावला जात आहे की दिल्ली कॅपिटल्स त्यांच्या महिला संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी जेमिमाह रोड्रिग्सकडे सोपवण्यात येऊ शकते. आत्तापर्यंत वूमन्स प्रीमियर लीगच्या (WPL) पहिल्या तीन हंगामात ऑस्ट्रेलियाची दिग्गज मेग लॅनिंगने दिल्लीचे नेतृत्व सांभाळले होते. ॉ

दिल्लीने तिन्ही वेळी अंतिम सामन्यातही प्रवेश केला, पण दिल्लीला विजेतेपद मिळवता आले नाही. पण लॅनिंगला चौथ्या हंगामापूर्वी दिल्लीने संघातून करारमुक्त केले. त्यामुळे दिल्लीच्या संघात कर्णधारपदाची जागा रिक्त झाली आहे.

दिल्लीने WPL लॉरा वुल्फार्टलाही संघात सामील केले आहे. मात्र तिला कर्णधारपद देणार नसल्याचे दिल्ली कॅपिटल्सच्या फ्रँचायझीने आधीच जाहीर केले असून यंदा भारतीय खेळाडू नेतृत्व करेल, असे संकेतही दिले होते. त्यामुळे आता जेमिमाहला ही जबाबदारी मिळण्याची चर्चा आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.