नागपूर : संपूर्ण देशात थंडीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यासोबतच दाट धुके, कडाक्याची थंडी आणि कमी दृश्यमानताही जाणवू लागली आहे. ज्याचा थेट परिणाम विमानसेवेवर होत आहे.
सोमवारीही (ता.२२) काही विमानांनी त्यांच्या निर्धारित वेळेपेक्षा उशिरा उड्डाण केले. यामध्ये फ्लाइट क्रमांक ६ई-६५२९ (दिल्ली - नागपूर) अर्धा तास, ६ई-६५३० (दिल्ली - नागपूर) १ तास, ६ई - ४८६ (बेंगळुरू - नागपूर) ४० मिनिटे आणि ६ई - ६७९८ (पुणे - नागपूर) १५ मिनिटे उशिरा नागपुरात पोहोचल्या.
Pune Airport : ऐन वेळेवर वैमानिकांचा उड्डाणास नकार! पुणे विमानतळावर काय घडलं? खरं कारण ऐकून थक्क व्हालत्याचप्रमाणे नागपुरातून उड्डाण करणाऱ्या विमानांमध्ये ६ई-६८०३ (नागपूर–बेंगळुरू) १ तास १० मिनिटे, एआय - २५८४ (नागपूर - मुंबई) ५० मिनिटे आणि फ्लाइट क्रमांक ६ई - ८३५ (नागपूर - पुणे) ४१ मिनिटे उशिरा रवाना झाली. धुक्यामुळे हवाई प्रवास काहीसा संथ झाला आहे