निवडणूक आयोगाने मोठी घोषणा करत थेट राज्यातील नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. 15 जानेवारीला मतदान झाले आणि आज 16 जानेवारी 2026 रोजी आज निकाल आहे. महापालिकेच्या निवडणुका राज्यात पुढे ढकलण्यात आल्याने जवळपास सर्वच महापालिकांवर प्रशासकीय राज होते. शेवटी राज्यात निवडणूका झाल्या. सर्वच राजकीय पक्ष पूर्ण तयारीने निवडणुकीच्या मैदानात उतरले. जोरदार प्रचार करण्यात आला. काही ठिकाणी युती तर काही ठिकाणी स्वतंत्रपणे या निवडणुका लढताना पक्ष दिसले. राज्यात सर्वाधिक चर्चेत ठरलेली महापालिका कोणती आहे ती म्हणजे पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली. अजित पवारांच्या पक्षाचे नक्कीच पिंपरी चिंचवडमध्ये वर्चस्व राहिले आहे. मात्र, भाजपानेही पूर्ण तयारी या निवडणुकीच्या मैदानात केली. राज्यातील युती आणि महाविकास आघाडीच्या पार्श्वभूमीवर पालिका निवडणुकीचे समीकरणे बदलल्याचे दिसले.
पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक 6 अ मधून भाजपाच्या यशोदा बोईनवाड, प्रभाग क्रमांक 6 ब मधून भाजपाच्या सारिका संतोष लांडगे, प्रभाग क्रमांक 6 क भाजपचे रवी लांडगे, प्रभाग क्रमांक 6 ड मधून भाजपाचे लांडगे राजेंद्र किसन विजयी झाले होते. प्रभाग क्रमांक 6 ची लोकसंख्या एकून 40,646 अ.जा. 6080 अ. ज. 2573. दिघी, समर्थनगर, गणेशनगर, बोपखेल गावठाणपर्यंत.
पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक 7 ची लोकसंख्या 42251 इतकी आहे. अनूसुचीत जाती 4449 मतदार आहेत तर अनूसुचीत जामातीचे 1578 मतदार आहेत. सोनाक्षी गव्हाणे, संतोष लोंढे, भिमाबाई फुगे, नितीन ज्ञानेश्वर लांडगे 2017 च्या निवडणुकीत विजयी ठरले होते. सेंच्युरी एन्का कॉलनी, सुविधा पार्क, आपटे कॉलनी, सॅंडविक कॉलनी, खंडोबा माळ, गव्हाणे वस्ती, भोसरी गावठाण, लांडेवाडी, शांतीनगर इत्यादी विभाग या प्रभागात येतात.
प्रभाग क्रमांक 8 मध्ये 59, 390, मतदार आहेत. यापैकी 8,898 हे अनुसूचित जातीचे तर 610 मतदार अनुसूचित जमातीचे आहेत. जलवायु विहार, केंद्रिय विहार, महाराष्ट्र कॉलनी, इंद्रायणीनगर, खंडे वस्ती, गवळीमाथा, बालाजीनगर, टाटा मोटर्स, यशवंतनगर, विठ्ठलनगर, उद्यमनगर, स्वप्ननगरी, अजमेरा सोसायटी, वास्तुउद्योग, मासुळकर कॉलनी, महिंद्रा रॉयल, खराळवाडी, नेहरूनगर आदी परिसर येतात, हा प्रभाग मोठा आहे.