नालासोपाऱ्यात ‘आरोग्यावर गप्पा’
विरार (बातमीदार)ः मन आजारी पडल्यावरच नव्हे, तर मन निरोगी ठेवण्यासाठीही डॉक्टरांची गरज असते, तणाव ही आजार नसून इशारा असल्याचे प्रतिपादन मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुरेश पाटील यांनी नालासोपारा येथे झालेल्या ‘आरोग्य गप्पा’ कार्यक्रमात केले. वसई तालुका पत्रकार संघ, वसई विरार शहर महापालिका वैद्यकीय आरोग्य विभाग नालासोपारा मेडिकल असोसिएशन, रिद्धी विनायक हॉस्पिटल नालासोपारा, पालघर जिल्हा बाल आरोग्य तज्ज्ञ संस्था, विरार मेडिकल असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन विरार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.