Sheikh Hasina Statement : बांगलादेशात हिंदू तरूणाच्या निर्घृण हत्येच्या घटनेवर शेख हसीना म्हणाल्या, ''हे तेच लोक आहेत का?, ज्यांना...''
esakal December 24, 2025 08:45 AM

Sheikh Hasina strongly condemns Hindu youth's murder in Bangladesh: बांगलादेशात काही दिवसांपूर्वी जमावाकडून एका हिंदू तरूणाची अतिशय निर्घृण हत्या केली गेली. या भयानक घटनेचा सर्वचस्तरातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. शिवाय, बांगलादेशातील युनूस सरकारवरही जोरदार टीका सुरू आहे. भारतानेही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

 राजधानी दिल्लीसह अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत. बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेरही निदर्शने करण्यात आली आहेत. आता, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनीही या घटनेचा तीव्र निषेध करत, या मुद्द्यावर एक निवेदन जारी केले आहे.

शेख हसीना काय म्हणाल्या? -

बांगलादेशमध्ये हिंदू तरुण दीपू दासच्या हत्येच्या घटनेवर एक ऑडिओ बाइट जारी केला आहे. शेख हसीना म्हणाल्या, "दीपू दासवर खोटे आरोप करण्यात आले... त्यांनी पैगंबरांचा अपमान केल्याचा पुरावा कोणीही देऊ शकला नाही.’’ तसेच ज्या निर्घृण पद्धतीने हत्या केली गेली, त्यावरून शेख हसीना यांनी विचारले की, ‘हे क्रूर लोक कुठून आले... हे तेच लोक आहेत का, ज्यांना त्यांनी खायला दिले, शिक्षण दिले आणि सुशिक्षित केले?  एवढच नाहीतर  त्यांनी दीपू दासच्या कुटुंबाला धीर न सोडण्याचे आवाहन केले आणि सांगितले की मी जिवंत असेपर्यंत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करेन.

Bangladesh Hindu Youth Murder Reason : बांगलादेशातील हिंदू तरूणाच्या निर्घृण हत्येमागचे खरे कारण अखेर आले समोर!

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविरुद्ध बांगलादेशपासून भारतापर्यंत आणि दिल्लीपासून काठमांडूपर्यंत निदर्शने होत आहेत. दिल्लीमध्ये, निदर्शकांना बांगलादेश उच्चायुक्तालयापर्यंत पोहोचण्यापूर्वीच रोखण्यात आले. त्यांना ताब्यात घेऊन बसमध्ये नेण्यात आले. तथापि, निदर्शकांचे म्हणणे आहे की ही फक्त एक झलक आहे.  जर युनूस सरकारने दीपू दासच्या मारेकऱ्यांना शिक्षा केली नाही तर एक मोठे आंदोलन उभे राहील..

Abu Azmi on Bangladesh Mob Lynching : बांगलादेशात जमावाने हिंदू तरूणास बेदम मारून जाळलं ; संतापजनक घटनेवर अबू आझमींची प्रतिक्रिया, म्हणाले...

बांगलादेशात जमावाने हिंदू तरुण दीपू चंद्र दास याला बेदम मारहाण करून ठार मारले आणि नंतर त्याचा मृतदेह झाडाला लटकवून जाळून टाकला. या भयानक घटनेच्या तपासात आता एक धक्कादाक नवीन वळण समोर आलय. सुरुवातीला, हा पैगंबर मुहम्मद यांच्याविरुद्ध ईशनिंदा केल्याचा खटला असल्याचे वृत्त होते, परंतु पोलिस आणि रॅपिड अॅक्शन बटालियन (RAB) च्या तपासात या आरोपाला पुष्टी देणारे कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत. तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की हत्येचे खरे कारण कारखान्यातील कामाचा वाद,  प्रोडक्शन टारगेट, जुने वैर, ओव्हरटाइम आणि अलिकडेच घेतलेली पदोन्नती परीक्षा होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.