Where to watch Rohit Sharma, Virat Kohli Vijay Hazare matches live: रोहित शर्मा व विराट कोहली हे दोन स्टार फलंदाज विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळणार असल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० व कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणारे रोहित व विराट हे फक्त वन डे फॉरमॅट खेळत आहेत. या दोघांनाही २०२७ चा वन डे वर्ल्ड कप खेळायचा आहे, परंतु BCCI ने त्यांना फिटनेस राखण्यासाठी विजय हजारे ट्रॉफीत खेळण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसारच रोहित व विराट अनुक्रमे मुंबई व दिल्ली संघासाठी दोन सामना खेळणार आहे. या सामन्यांचे वेळापत्रक समोर आले आहे.
या स्पर्धेत सहभागी ३२ संघाचा प्रत्येकी ८ अशा चार गटांत विभागणी केली गेली आहे. पाच शहरांमध्ये २४ डिसेंबर ते १८ जानेवारी या कालावधीत या स्पर्धेचे सामने खेळवले जाणार आहे. रोहित, विराट यांच्यासह या स्पर्धेत भारताचा कसोटी व वन डे संघाचा कर्णधार शुभमन गिल, ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, रिषभ पंत व अर्शदीप सिंग हेही स्टार खेळाडू खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे यंदाच्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेला वेगळीच महत्त्व प्राप्त झाले आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला वर्क लोडमुळे विश्रांती दिली गेली आहे.
तुमची जागा आमच्या पायाजवळ! Vaibhav Suryavanshi च्या कृतीने पाकड्यांचा जळफळाट; मोहसिन नक्वी, सर्फराज अहमदची रडारड, ICC कडे तक्रारवन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत दुसऱ्या स्थानी असलेला विराट २०१० नंतर प्रथमच विजय हजारे ट्रॉफीत खेळणार आङे. रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली त्याचा दिल्लीच्या संघात समावेश केला गेला आहे. रोहितही मुंबईकडून शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. गिलसोबत पंजाबच्या संघात अर्शदीप व अभिषेक शर्मा हे दिसतील, तर लोकेश राहुल कर्नाटक संघाकडून खेळेल. नितीश रेड्डी व इशान किशन हे अनुक्रमे हैदराबाद व झारखंड संघाचे नेतृत्व करतील.
मुंबईचा संघ - शार्दूल ठाकूर ( कर्णधार), रोहित शर्मा, इशान मुलचंदानी, मुशीर खान, अंगक्रिश रघुवंशी, सर्फराज खान, सिद्धेश लाड, चिन्मय सुतार, आकाश आनंद, हार्दिक तामोरे, शाम्स मुलानी, तनुष कोटियन, तुषार देशपांडे, ओंकार तरमाळे, सिलव्हेस्टर डीसुझा, साईराज पाटील, सुर्यांश शेडगे, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे.
दिल्लीचा संघ - रिषभ पंत ( कर्णधार), आयुष बदोनी, विराट कोहली, अर्पित राणा, यश धुल, सार्थक रंजन, प्रियांश आर्या, तेजस्वी सिंग, नितीश राणा, हृतिक शोकीन, हर्ष त्यागी, समिरजीत सिंग, प्रिंस यादव, दिविज मेहरा, आयुश डोसेजा, वैभव कंडपाल, रोहन राणा, इशांत शर्मा, नवदीप सैनी
मुंबई विरुद्ध सिक्किम - २४ डिसेंबर
मुंबई विरुद्ध उत्तराखंड - २६ डिसेंबर
दिल्ली विरुद्ध आंध्र प्रदेश - २४ डिसेंबर
दिल्ली विरुद्ध गुजरात - २६ डिसेंबर
विराट कोहली चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळणार असल्याने हा सामना बंद दरवाजात खेळवला जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना प्रवेश नाही. सुरक्षेच्या कारणामुळे हा निर्णय घेतला गेला आहे.
टी२० वर्ल्ड कपसाठी Shubham Gill ची जागा घेतली आता IPL फ्रँचायझी काढणार वचपा? 'त्या' Video नंतर चर्चा LIVE TELECAST & STREAMING DETAILSविजय हजारे ट्रॉफीचे सर्व सामने सकाळी ९ वाजता सुरू होतील, परंतु काहीच मोजक्याच सामन्यांचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. हे सामने Star Sports Network वर आणि Jio Star website व app वर पाहता येतील.