Winter Special Recipe: नेहमीच्या नाश्त्याला कंटाळलात? फक्त 15 मिनिटांत बनवा 'हे' क्रिस्पी कांदा ब्रेड पकोडे, घरच्यांकडून मिळेल कौतुक
esakal December 24, 2025 09:45 PM

crispy onion bread pakoda recipe at home: हिवाळ्यात सकाळी गरमागरम आणि क्रिस्पी नाश्ता मिळाला तर दिवसाची सुरुवातच खास होते. रोज एकाच प्रकारचा नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर आता काहीतरी वेगळं आणि चविष्ट ट्राय करायचे असेल तर ही बातमी शेवटपर्यंत वाचा. फक्त 15 मिनिटांत तयार होणारे क्रिस्पी कांदा ब्रेड पकोडे हा हिवाळ्यासाठी परफेक्ट पर्याय ठरू शकतो. हे पकोडे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ लागतात, त्यामुळे एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा खावेसे वाटतात. ही रेसिपी बनवायला खूपच सोपी आहे. घरात सहज उपलब्ध असलेल्या कांदा, ब्रेड आणि बेसनाच्या मिश्रणातून तयार होणारे हे पकोडे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. तुम्ही चहासोबत या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. कांदा ब्रेड पकोडे बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.

कांदा ब्रेड पकोडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य

बारिक चिरलेला कांदा

बारिक चिरलेली कोथिंबीर

बारिक चिरलेली हिरवी मिरची

तेल

मीठ

तांदळाचे पीठ

बेसण

तिखट

हळद

कांदा ब्रेड पकोडे बनवण्याची कृती

एका मोठ्या भांड्यात बारिक चिरलेला कांदा, आलं, कोथिंबीर, बारिक चिरलेली हिरवी मिरची, लाल तिखट, हळद, मीठ, ओवा, बेसण, तांदळाचे पीठ सर्व चांगले मिसळावे. नंतर त्यात थोडे पाणी घालून मिश्रण थोडे पतले करावे. नंतर एका कढईत तेल गरम करा. नंतर ब्रेडचे त्रिकोणी तुकडे करा आणि त्यावर कांद्याचे सारण लावा. नंतर तेलात तळावे. गरम कांदा ब्रेड पकोडे तयार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Vritta Sawhney (@snapsfromkitchen)