Software Engineer Kills Wife : बंगळूरमध्ये मंगळवारी सायंकाळी एक धक्कादायक गुन्हा (Bengaluru Crime) उघडकीस आला आहे. ४० वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने आपल्या वेगळे राहणाऱ्या पत्नीवर गोळ्या झाडून तिची हत्या केली. या घटनेनंतर आरोपीने जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मृत महिलेचे नाव भुवनेश्वरी (वय ३९) असून त्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या बसवेश्वरनगर शाखेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कार्यरत होत्या. मंगळवारी संध्याकाळी कामावरून घरी परतत असताना मगडी रोड परिसरात आरोपी बालमुरुगनने त्यांना अडवले.
सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान, त्याने अगदी जवळून पिस्तुलातून चार गोळ्या झाडल्या, असे पोलिसांनी सांगितले. गंभीर जखमी अवस्थेत भुवनेश्वरी यांना शानबाग रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
Viral Video : डॉक्टर की गुंड? सरकारी रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या रुग्णाला डॉक्टरकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण; व्हायरल व्हिडिओने खळबळबालमुरुगन आणि भुवनेश्वरी यांचे २०११ साली लग्न झाले होते. दोन मुलांचे पालक असलेले हे जोडपे गेल्या दीड वर्षांपासून वैवाहिक मतभेदांमुळे वेगळे राहत होते. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्याच कारणामुळे भुवनेश्वरी सहा महिन्यांपूर्वी व्हाईटफील्डहून राजाजीनगर येथे राहायला गेल्या होत्या. मात्र, बालमुरुगनने त्यांचा पाठलाग करत चार महिन्यांपूर्वी केपी अग्रहारा पोलिस हद्दीतील चोलुरपाल्या परिसरात राहायला सुरुवात केली.
घटनेच्या एका आठवड्यापूर्वी आरोपीने पत्नीला घटस्फोटाची कायदेशीर नोटीसही पाठवली होती. पश्चिम विभागाचे डीसीपी एस. गिरीश यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालमुरुगन पूर्वी एका खासगी आयटी कंपनीत कार्यरत होता; मात्र गेल्या चार वर्षांपासून तो बेरोजगार होता. आरोपी आणि मृत महिला दोघेही तामिळनाडूतील सेलम जिल्ह्याचे रहिवासी आहेत.
हत्येनंतर बालमुरुगन थेट मगडी रोड पोलिस ठाण्यात गेला. तेथे त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि वापरलेले शस्त्र पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.