इचलकरंजी : इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे. सर्वसाधारणपणे ५० जागा भाजपकडे राहतील, अशी माहिती समोर येत आहे, तर ११ जागा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला देण्याबाबत एकमत झाल्याचे सांगण्यात आले. उर्वरित चार जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडण्याची शक्यता आहे.
पण, ऐनवेळी त्यांना सहा जागा देण्यावर एकमत होऊ शकते, अशी चर्चा आहे. त्यानुसार पुढील दोन दिवसांत महायुतीतील प्रभागनिहाय उमेदवार निश्चित करण्यास वेग येणार आहे. दरम्यान, सांगलीत मंत्री चंद्रकात पाटील, माजी आमदार सुरेश हाळवणकर व प्रकाश आवाडे यांची एकत्रित बैठक झाल्याचे समजते.
Jalgaon Municipal Election : भाजपला पराभवाची भीती; म्हणून आमचे 'विजयी उमेदवार' फोडले: संजय सावंत यांचा हल्लाबोलत्यामुळे भाजपच्या बहुतांशी प्रभागातील उमेदवारांची नावे उद्याच म्हणजे बुधवारी निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. अशा उमेदवारांना कामाला लागण्याचे आदेश पक्षश्रेष्ठीकडून दिले जातील, असे संकेत आहेत.
उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी महायुती व महाविकास आघाडीप्रणित शिव-शाहू आघाडीचे अद्याप उमेदवार निश्चित नाहीत. महायुतीमध्ये जागा वाटपाचा घोळ आहे. भाजप-शिवसेना यांच्यातील युती पक्की आहे; पण राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये सहभागी होण्याची चिन्हे कमी दिसत आहेत.
Kolhapur Election : महायुतीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात; भाजप-शिंदे गटात सख्य, राष्ट्रवादीत अस्वस्थतात्यांना शेवटच्या टप्प्यात महायुतीकडून सहा जागांची आफर दिली जाऊ शकते. ती मान्य न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढण्याचा निर्णय घेऊ शकते. शिवसेनेला किमान दोन आकडी जागा देण्याबाबत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली आहे. त्यामुळे १० ते ११ जागांवर तोडगा निघण्याची शक्यता आहे.
दरम्यान, इच्छुकांची भरमसाठ संख्या पाहता भाजपकडून तत्काळ उमेदवारी यादी जाहीर केली जाण्याची शक्यत कमी आहे. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी अंतिम टप्प्यात उमेदवारी यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. भाजपांतर्गत बैठकांना जोर.
भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांना उमेदवारी डावलण्यात येत असल्याची भावना निर्माण झाली आहे. आज अचानक काही प्रभागात नवीन चेहरे भाजपकडून उमेदवारीसाठी चर्चेत आले आहेत. त्यामुळे मूळ भाजपच्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. याबाबत आज मूळ भाजपच्या नेतेमंडळींच्या निवासस्थानी बैठकांचे सत्र सुरू होते.