नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या देशातील अत्याधुनिक ग्रीनफिल्ड विमानतळाच्या यशस्वी उभारणीने भारताच्या पायाभूत विकासाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावा असा एक अध्याय जोडला गेला आहे. सिडकोची दूरदृष्टी, चिकाटी आणि सक्षम अंमलबजावणीचे हे भव्य प्रतीक असून, २५ डिसेंबरला येथून पहिली विमानसेवा सुरू होत आहे. पहिल्याच दिवशी तब्बल ३० विमाने उडणार आहेत. नवी मुंबई, महाराष्ट्र तसेच संपूर्ण देशासाठी हा स्वप्नपूर्तीचा क्षण आहे.
नियोजनापासून प्रत्यक्ष कार्यान्वित होईपर्यंत अनेक दशकांचा प्रवास असलेल्या या प्रकल्पामध्ये अत्यंत काटेकोर नियोजन, विविध यंत्रणांमधील समन्वय आणि अभियांत्रिकी कौशल्याचा उत्कृष्ट संगम पाहायला मिळतो. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील हवाई वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. नियोजित मल्टिएअरपोर्ट प्रणाली अधिक सक्षम होणार आहे.
Mumbai News: दामोदर हॉलचा पुनर्विकास रखडला; नाट्यप्रेमींचा सवाल, आर्थिक घोटाळ्याचे सावट अभियांत्रिकी उत्कृष्टतेचे प्रतीकसिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कमळाकृती संकल्पनेवर आधारित अत्यंत आकर्षक टर्मिनल रचनेसाठी अदाणी समूह तसेच एनएमआयएएल यांचे मनःपूर्वक आभार नोंदविले आहेत. ही भव्य रचना आता विमानतळाची एक प्रभावी वास्तुशिल्पीय ओळख बनली आहे. भारतीय सांस्कृतिक मूल्यांचे दर्शन घडविण्यासोबतच शाश्वत विकास, नवोन्मेष आणि जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकी उत्कृष्टतेचे प्रतीक ठरते.
मानदंड ठरलामहाराष्ट्र शासनाने सिडकोसोबत मिळून या ऐतिहासिक प्रकल्पासाठी आवश्यक ठरलेल्या उत्कृष्ट समन्वय आणि सामायिक दूरदृष्टीची दखल घेतली आहे. महाराष्ट्र शासन, सिडको, अदाणी समूह आणि एनएमआयएल यांच्यातील सुरळीत व प्रभावी समन्वयामुळे आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आधुनिक विमानतळ पायाभूत सुविधांचा एक मानदंड ठरला असून, महाराष्ट्र व देशासाठी अभिमानास्पद नवे प्रवेशद्वार म्हणून उभा राहिला आहे.
Mumbai News: उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीतही नियमांचे उल्लंघन, समितीच्या अहवालातून माहिती उघडहा विमानतळ कार्यान्वित झाल्यानेनवी मुंबईतील नागरिकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि सुलभ होणार आहे. पुणे, ठाणे, पनवेल, रायगड तसेच कोकणातील इतर भागांतील नागरिकांनाही देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासासाठी मोठा लाभ मिळणार आहे.
पहिल्या दिवशीची विमानसेवा - २५ डिसेंबर २०२५
एकूण विमान संचालन - पहिल्या दिवशी एकूण ३० एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्स
विमान कंपनी - इंडिगो, एअर इंडिया एक्स्प्रेस, आकासा एअर व स्टार एअर
पहिले आगमन : ६ E ४६० - बंगळूर येथून - सकाळी ०८.०० वाजता
पहिले प्रस्थान : ६ E ८८२ - हैदराबादकडे - सकाळी ०८.४० वाजता
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संचालनास प्रारंभ होणे हे महाराष्ट्र शासन व सिडकोची पायाभूत सुविधा विकासाबाबत सातत्यपूर्ण बांधिलकी अधोरेखित करते. हा प्रकल्प सिडकोच्या बांधिलकीची हमी देत असून, भविष्योन्मुख पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक विकास आणि जागतिक स्तरावर कनेक्टिव्हिटीसाठी आमची कटिबद्धता अधोरेखित करतो. या प्रवासात विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे हे सामूहिक यश आहे.
- विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक