पुणेकरांसाठी आनंदाची बातमी
पुणे मेट्रो ३ लाइन मार्चमध्ये होणार सुरु
हिंजवडी ते शिवाजीनगर प्रवास सुखकर होणार
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आता पुण्यात आणखी एक नवी मेट्रो लाइन सुरु होणार आहे. PMRDA ची पुणे मेट्रो लाइन ३ सुरु होण्याचा मूहूर्त आता ठरला आहे. मार्च महिन्यात ही मेट्रो लाइन प्रवाशांसाठी सुरु होणार आहे. ही मेट्रो हिंजवडी ते शिवाजीनगरपर्यंत असणार आहे. यामुळे हजारो प्रवाशांना वेळ वाचणार आहे. त्यांना सुविधा मिळणार आहे.
Pune-Nagpur Vande Bharat Train: पुणे - नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मोठा बदल, रेल्वेने नेमका काय घेतला निर्णय?पुण्यातील मेट्रोसेवा तीन वर्षांपूर्वीच सुरु झाली होती. मात्र, काही मर्यादित स्थानकांपर्यंतच ही मेट्रो सेवा होती. आता या मेट्रोचा विस्तार होत आहेत. येत्या काही महिन्यात अजून काही प्रकल्पांची घोषणा केली जाणार असल्याचे प्राधिकरणाने सांगितले आहे.
मार्चमध्ये होणार पुणे मेट्रो सुरु
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे मेट्रो ३ या वर्षाच्या शेवटी सुरु झाली नाही. तरीही २०२६ च्या मार्चमध्ये पिंक लाइनचे उद्घाटन केले जाईल. याबाबत माहिती देताना सांगितले की, आम्ही पुणे मेट्रोची अंबलबजावणी करणारी संस्था PITCMRL ला ३१ मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.अनेकदा त्यांना मुदतवाढ देण्यात आली. मात्र, यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नाही, असं पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनीदेखील मेट्रोचे काम लवकर पूर्ण करण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, अंतिम मुदतीत मेट्रो सुरु होईल लाइन ३ वरील काम वेळेवर पूर्ण झाले पाहिजे. अंतिम मुदतीनुसार काम सुरु करा, असं फडणवीसांनी सांगितले.
Mumbai Metro 8: मुंबई, मानखुर्द ते पनवेल, 11 स्थानकं कोणती? कसा असेल मुंबई-नवी मुंबई जोडणारा मेट्रो ८ चा प्रोजेक्ट?खर्च किती?
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो कॉरिडॉरचा खर्च ८,३१३ कोटी रुपये आहे. यासाठी १,३१५ कोटींची खाजगी गुंतवणूक, ४,७८९ कोटी रुपयांचे संस्थात्मक कर्ज, ९०.५८ कोटी रुपयांचे राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारने १,२२४.८ कोटींचे योगदान दिले. याआधीही अनेकदा मेट्रो सुरु होणार असं सांगितलं होतं. मात्र, आता ही सेवा मार्च महिन्यात सुरु होणार आहे.
Thane Metro 4: मुहूर्त ठरला! कॅडबरी जंक्शन ते गायमुखपर्यंतची ठाणे मेट्रो 4 या दिवशी होणार सुरु; कोणत्या स्थानकावर थांबणार?