पिंपळवंडी, ता. २४ : भटकळवाडी (ता. जुन्नर) शिवारातील शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी (ता. २४) बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. या परिसरात बिबट्या सतत निदर्शनात येत असल्याने १५ दिवसांपूर्वी याठिकाणी ग्रामस्थांच्या मागणीवरून वनविभागाने पिंजरा लावला होता. बुधवारी यात एक चार वर्षे वयाचा नर बिबट यात जेरबंद झाला असल्याची माहिती वनविभागाने दिली. या बिबट्याला माणिकडोह येथील निवारा केंद्रात नेण्यात आले आहे.
2721