सांगली : आचारसंहिता लागली, इच्छुक उमेदवारांची प्रचारपत्रके मतदारांच्या दारी पडू लागली. अर्ज प्रक्रियेला देखील आजच सुरुवात झाली आहे. प्रमुख पक्षाचे उमेदवार निश्चित व्हायचे आहेत, त्याआधीच ‘जनतेचा जाहीरनामा’ लोकांच्या हाती पडला आहे. नागरिक संघटनेचे कार्यवाह वि. द. बर्वे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून आलेल्या सूचनांचा मागोवा घेऊन जनतेचा जाहीरनामा प्रसिद्ध करत असल्याचे श्री. बर्वे म्हणाले.
Suhas Babar : “निवडणुका म्हणजे लोकशाहीचा ‘उत्सव’, मतांचा ‘बाजार’ नव्हे प्रखर भूमिका”‘‘जनतेच्या जाहीरनाम्यात मुद्देसूद आरोप करण्यात आले आहेत. आरोप खोटे असतील, ते सिद्ध केले, तर द्याल ती शिक्षा भोगण्यास मी तयार आहे.’’ असे नमूद करतानाच ‘मतदारांनी आपला अधिकार वाया घालवू नका, आपले मत विकू नका. योग्य व्यक्तीची करा,’ अशी साद त्यांनी घातली आहे.
जाहीरनाम्यात जनतेच्या प्रश्नांचा आणि महानगरपालिका स्थापन झाल्यापासून प्रशासन आणि नगरसेवकांनी केलेल्या लूटमारीचा पंचनामा केलेला आहे. नागरिक संघटनेने विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’ सादर केली आहे. भ्रष्टाचाराचा अहवाल विचारात घेऊन मतदारांनी चांगल्या आणि नागरिक संघटनेने जाहीर केलेल्या शपथपत्राला मान्यता देणाऱ्या उमेदवारांनाच निवडून द्यावे, अशी विनंती पत्राद्वारे केली आहे. मतदारांनी सर्व उमेदवारांकडून शपथपत्र भरुन घ्यावीत. असेही सुचवण्यात आले आहे.
Sangli Politics : 'महापालिकेची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार'; जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील यांची मोठी घोषणा काय आहे जाहीरनाम्यात..?जाहीरनाम्याच्या प्रस्तावनेत सांगलीचे प्रश्न मांडणाऱ्यांचे कौतुक, तर भ्रष्टाचारी राजकारण्यांवर आसूड ओढला आहे. यात उमेदवार कसा असावा आणि नसावा, याची सोदाहरण माहिती दिली आहे.
नागरी विकासाचा आराखडा मांडला आहे. यात घरपट्टीचा प्रश्न, नाट्यगृहे, सार्वजनिक उद्याने, ओढे नाले, गटारे, काळी खण, भाजी मंडई, शामरावनगर, गुंठेवारी, खोकीधारक आणि त्यांचे प्रश्न, याचा ऊहापोह करण्यात आला आहे.
तसेच विद्युत घोटाळा, एचसीएल प्रकरण, बीओटीची बेकायदेशीर बांधकामे व अन्य घोटाळे, भूखंडाचे श्रीखंड, माळ बंगला जागेची खरेदी, शेलीनाला, शामरावनगर, समुद्रा कंपनीचे दिवे, खड्डे अशी भ्रष्टाचाराची प्रकरणे प्रसिद्ध केली आहेत. शेवटी शपथपत्राचा नमुना देण्यात आला आहे.