भारताला रशियाकडून गुड न्यूज, थेट 5 देशांसोबत मोठी भागीदारी, अमेरिकेची हवा गूल..
Tv9 Marathi December 25, 2025 05:45 PM

भारत आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून व्यापार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दाैऱ्यावर आले आणि त्यांनी भारतासोबत अनेक महत्वाचे करार केले. पुतिन यांनी भारत दाैऱ्यावर येत एकाच दिवशी अनेक करार करत जगाला दाखवून दिले की, भारत आणि रशियातील नाते काय आहे. मागील काही महिन्यापासून भारत आणि अमेरिकेतील व्यापार चर्चा अडकली असून व्यापार करार काही होत नाहीत. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला. अमेरिकेच्या टॅरिफमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी रशिया भारताच्या मदतीला धावून आला असून रशियाचे मार्केट भारतीय वस्तूंसाठी त्यांनी मोकळे केले असून भारतीय वस्तूंचे आम्ही आमच्या बाजारपेठांमध्ये स्वागत करू असे रशियाने स्पष्ट केले.

यादरम्यानच भारताला रशियातून मोठी आनंदाची बातमी येताना दिसत आहे. भारतीय उत्पादने लवकरच रशियन दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. रशियाचे उपपंतप्रधान अलेक्सी ओव्हरचुक यांनी सांगितले की, ते भारतासोबत मुक्त व्यापार करार होतील. झपाट्याने वाढणारी बाजारपेठ आहे. हा देश आपल्या खूप जवळचा आणि आपला मित्रही आहे.

त्यांना आमच्यासोबत काम करायचे आहे आणि आमच्यासोबत व्यवसाय करायचा आहे आणि या सर्व गोष्टी विशिष्ट करारांद्वारे निश्चित केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारत आणि रशियात अजूनही काही महत्वाचे व्यापार करार होणार आहेत. हा अमेरिकेसाठी अत्यंत मोठा झटका म्हणावा लागेल. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले की, भारत रशियाच्या नेतृत्वाखालील युरेशियन इकॉनॉमिक युनियन (EAEU) सोबत मुक्त व्यापार करारासाठी चर्चा सुरू आहे.

भारत, रशिया, आर्मेनिया, बेलारूस, कझाकिस्तान, किर्गिस्तान यांचा समावेश असलेल्या पाच सदस्यीय युरेशियन इकॉनॉमिक युनियनसोबत (EAEU) मुक्त व्यापार करारावर (FTA) चर्चा करत आहे. हे व्यापार करार फायनल होण्याची दाट शक्यता आहे. भारतासाठी ही एकप्रकारे मोठी सुवर्णसंधीच असणार आहे. अमेरिकेने लावलेल्या मोठ्या टॅरिफनंतर भारत अनेक देशांसोबत मुक्त व्याापार करत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.