Latest Marathi News Live Update : हिंदूंच्या घरांवर हल्ला करणाऱ्यांची माहिती देणाऱ्यांना बांगलादेश पोलिसांनी बक्षीस जाहीर केले
esakal December 26, 2025 04:45 AM
Bangladesh Live : हिंदूंच्या घरांवर हल्ला करणाऱ्यांची माहिती देणाऱ्यांना बांगलादेश पोलिसांनी बक्षीस जाहीर केले

बांग्लादेशात हिंदूंवर हल्ले वाढले आहेत. एका हिंदू तरुणाची मॉब लिंचिंग करण्यात आल्यावर तणाव निर्माण झाला आहे. यामुळे बांगलादेश पोलिसांनी हिंदूंच्या घरांवर हल्ला करणाऱ्यांची माहिती देणाऱ्यांना  बक्षीस जाहीर केले केले.

Live: नाताळ आणि थर्टीफस्ट निमित्त मालवणमध्ये पर्यटक दाखल

ख्रिसमस आणि थर्टीफस्टच्या सुट्या एन्जॉय करण्यासाठी पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत. मालवण, देवगड व वेंगुर्ल्यातील समुद्र किनार्यांवर पर्यटक गर्दी करताना दिसून येत आहेत. मालवणच्या दांडी किनार्यावर स्कुबा डायविंग, बनाना रायडिंग, स्नॉर्कलिंग, प्यारासेलिंग या वाॅटर स्पोर्ट्सची पर्यटक मजा लुटत आहेत. मालवणी खाद्यसंस्कृतीचाही पर्यटक आस्वाद घेताना पाहायला मिळत आहेत. तसेच नवीन वर्ष आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी हे पर्यटक पुणे, मुंबई, नाशिक वरून मालवण मध्ये दाखल झाले आहेत.

Live: बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांचा भाजपला घरचा आहेर

नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना तिकीट द्या तसेच एका परिवारामध्ये एकापेक्षा जास्त तिकीट देऊ नये अशी भूमिका बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केले.

तसेच नांदेडच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकाच परिवारामध्ये सात जणांना तिकीट दिले होते, आणि त्यांचा पराभूत झाला. आता तरी भाजपने एकाच परिवारामध्ये एकालाच तिकीट देण्यात यावं, सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार करावा. तसेच बेलापूर मतदारसंघात 40 जागा शिवसेनेने सोडाव्या अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे.

Pune Live: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना मनसेची गणितं ठरली

पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना मनसेची गणितं ठरली

९१+७४ या फॉर्मुल्या ने शिवसेना उबाठा मनसे पुणे महापालिका निवडणूक लढवणार

९१ जागा शिवसेना उबाठा तर ७४ जागांवर मनसे निवडणूक लढवणार

काँग्रेस पक्षाशी अंतिम टप्प्यात दोन्ही पक्षाकडून बोलणी सुरू

Indian Army issues policy: 827 भारतीय लष्कराकडून इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया ॲप्लिकेशन्सच्या वापराबाबत धोरण जारी

भारतीय लष्कराने इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया ॲप्लिकेशन्सच्या वापराबाबत धोरण जारी केले आहे, ज्यानुसार कर्मचाऱ्यांना इंस्टाग्रामवर केवळ "पाहण्यासाठी आणि निरीक्षण करण्यासाठी" प्रवेश करण्याची परवानगी आहे. इंस्टाग्रामवर कोणत्याही टिप्पण्या/मते व्यक्त केली जाणार नाहीत, असे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्काईप, व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि सिग्नलसारख्या ॲप्ससाठी - सामान्य स्वरूपाच्या अवर्गीकृत माहितीची/सामग्रीची देवाणघेवाण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सामग्रीची देवाणघेवाण केवळ परिचित व्यक्तींसोबतच केली जाईल. प्राप्तकर्त्याची योग्य ओळख पटवण्याची जबाबदारी वापरकर्त्याची असेल.

यूट्यूब, एक्स (पूर्वीचे ट्विटर), कोरा आणि इंस्टाग्रामसारख्या ॲप्ससाठी - ज्ञान/माहिती मिळवण्यासाठी केवळ निष्क्रिय सहभागास परवानगी आहे. वापरकर्त्याने तयार केलेली सामग्री/संदेश इत्यादी अपलोड करण्यास परवानगी नाही.

लिंक्डइनचा वापर केवळ संभाव्य कर्मचारी/मालकांविषयी माहिती मिळवण्यासाठी बायोडाटा अपलोड करण्याकरिता केला जाऊ शकतो.

Flynas XY 325: फ्लायनास XY 325 च्या आरजीआयए ग्राहक समर्थन ईमेलवर बॉम्बच्या धमकीचा एक ईमेल

आज सकाळी फ्लायनास XY 325 च्या आरजीआयए ग्राहक समर्थन ईमेलवर बॉम्बच्या धमकीचा एक ईमेल प्राप्त झाला. विमान सुरक्षितपणे उतरले. सर्व सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले: आरजीआयए अधिकारी.

Dhule Live : धुळ्यात ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने मनुस्मृतीचे दहन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे केलेल्या मनुस्मृती दहनाच्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ, धुळ्यात ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने मनुस्मृती दहन करण्यात आले. यावेळी पँथर सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धुळे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मनुस्मृतीच्या प्रतिंचे दहन केले.

Kolhapur Live : कोल्हापुरात गाभण गाईचा मृत्यू, भानामती करणी केल्याचा आरोप

कोल्हापूर जिल्ह्यातील चूये गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका शेतकऱ्याच्या गोठ्यात गाभण गाईचा मृत्यू झाला आहे. गोठ्यात गुलाल लावलेला भात, टाचण्या टोचलेले, गुलाल टाकलेले लिंबू आणि काही अंतरावर मृत अवस्थेत पडलेली गाय आढळली आहे. ही एक धक्कादायक घटना आहे.

Live : सुट्यांमुळे तुळजाभवानी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी; दर्शन व्यवस्थेत बदल

सुट्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर येथील मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. सुट्यांचा लाभ घेत मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी तुळजापुरात दाखल होत आहेत. दरम्यान, शांकभरी नवरात्रोत्सवापूर्वी देवीची मंचकी निद्रा सुरू असून २८ डिसेंबर रोजी आई तुळजाभवानी सिंहासनावर विराजमान होणार आहे. त्यानंतर नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे.

भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन ३१ डिसेंबरपर्यंत सामान्य भाविकांसाठी महाद्वार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांना कुंभार गल्लीतील झुलत्या पायऱ्यांमार्गे मंदिरात प्रवेश दिला जात आहे. यासोबतच २०० रुपयांचे सशुल्क दर्शन पास आणि रेफरल दर्शन पास बंद करण्यात आले आहेत. मात्र, व्हीआयपी भाविकांसह ५०० रुपयांचे स्पेशल दर्शन पास, अभिषेक पूजा व सिंहासन पूजेच्या भाविकांना महाद्वारातून प्रवेश देण्यात येत आहे.

भाविकांना सुलभ दर्शन मिळावे तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंदिर संस्थानच्या वतीने हे नियोजन करण्यात आले आहे.

Nagpur Live : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात भाजपच्या महत्त्वाच्या बैठका सुरू

नागपुरात भाजपच्या महत्त्वाच्या बैठकींना सुरुवात झाली आहे. अकोला, अमरावती आणि चंद्रपूर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठका घेतल्या जात आहेत. भाजपच्या धंतोली परिसरातील विदर्भ कार्यालयात या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

सध्या अकोला कोअर कमिटीची बैठक सुरू असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संघटन मंत्री भूपेंद्र कोठेकर यांच्यासह चर्चा होत आहे. दुपारनंतर अमरावती महापालिकेसाठी, तर संध्याकाळी चंद्रपूर महापालिकेसाठी बैठक होणार आहे.

महायुती, उमेदवारी निश्चिती आणि निवडणूक रणनीती या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. बैठकींना विद्यमान व माजी जिल्हाध्यक्ष, आमदार, माजी आमदार तसेच महापालिका हद्दीतील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अकोल्याच्या सुरू असलेल्या बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अनुप धोत्रे, अकोला शहराध्यक्ष जयंत म्हसणे, विजय अग्रवाल यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित असल्याची माहिती आहे.

Mumbai Live : अंधेरी पश्चिमेतील सॉरेंटो टॉवरमध्ये आग; नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले

अंधेरी पश्चिमेतील वीरा देसाई रोडवरील सॉरेंटो टॉवर या निवासी इमारतीत मंगळवारी सकाळी लेव्हल–१ आग लागल्याची घटना घडली. सकाळी १०.०५ वाजता ही आग लागल्याची माहिती बीएमसीच्या अग्निशमन नियंत्रण कक्षाला मिळाली. दहाव्या ते एकविसाव्या मजल्यांदरम्यानच्या इलेक्ट्रिक शाफ्टमधील वायरिंग व विद्युत उपकरणांना आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.अग्निशमन दलाने तत्काळ कारवाई करत १६व्या मजल्यावरील रिफ्युज एरियातून ३० ते ४० नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले, तर १५व्या मजल्यावरील एका फ्लॅटमधून तीन जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली. ही आग ११.३७ वाजता पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Nashik Live : नाशिकमध्ये पक्षप्रवेशाआधीच गोंधळ, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

नाशिकमध्ये पक्षप्रवेशाआधीच गोंधळ

कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

Pune Live : पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी सोबत लढण्यास कॅाग्रेस तयार नसल्याची सुत्रांची माहिती ..

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपविरोधात मोठा संधी मिळवण्याच्या अजित पवारांच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस पक्ष पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेससोबत सहकार्य करून लढण्यासाठी तयार नाही.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून अजित पवारांसोबत जाण्याला रेड सिग्नल दिला असून, त्यांना अशी धोरणात्मक पद्धत स्वीकारणे योग्य नाही, असे स्पष्ट केले आहे. यामुळे अजित पवारांच्या भाजपविरोधी संकल्पना आणि मोर्चेबांधणीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.

Pimpri Chinchwad liveupdate : उमेदवारी डावल्याने भाजप संभाव्य उमेदवाराला इच्छुक उमेदवारांच्या समर्थक महिलांनी विचारला जाब

पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या संभाव्य उमेदवाराचा पॅनल जवळपास निश्चित झाला आहे. त्यामुळे नाराज झालेल्या इच्छुक उमेदवाराच्या समर्थनार्थ महिलांनी भाजपच्या संभाव्य उमेदवाराच्या पॅनलला दत्तवाडी येथे अडवून जाब विचारला आहे. प्रभाग क्रमांक 14 मधून भाजपच्या पदाधिकारी दीपा महेश काटे या इच्छुक उमेदवार आहेत. मात्र प्रभाग क्रमांक 14 मध्ये भाजपमध्ये ऐनवेळी आयात उमेदवार आल्याने दीपा महेश काटे यांची उमेदवारी पक्षाकडून डावलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काल संध्याकाळी प्रभाग क्रमांक 14 मध्ये भाजप संभाव्य उमेदवाराच्या दत्तवाडी या ठिकाणी प्रचार करत असताना दीपा महेश काटे यांच्या समर्थक महिलांनी आक्रमक होत भाजपाच्या संभाव्य उमेदवारांच्या पॅनलला जाब विचारला आहे.

Nandedliveupdate : मूदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार गावात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. दोन भावांनी रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली, तर त्यांच्या आई-वडिलांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. आई-वडिलांनी आत्महत्या केली की घातपात झाला याचा तपास सुरू आहे. घटनेचे कारण अस्पष्ट असून, आर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या जवळा मुरार गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून वरिष्ठ अधिकारी गावात दाखल झाले आहेत. 22 वर्षीय बजरंग रमेश लखे आणि 25 वर्षीय उमेश रमेश लखे या दोन सख्ख्या भावांनी मुगट रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेखाली आत्महत्या केली. त्यांचे वडील 51 वर्षीय रमेश होनाजी लखे आणि आई 44 वर्षीय राधाबाई रमेश लखे यांचे मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. लखे कुटुंबात हे चारच जण होते. संपूर्ण कुटुंब या घटनेमुळे समाप्त झाले. उमेश लखे हा मनसेचा मुदखेडचा माजी तालुका उपाध्यक्ष असल्याची माहिती आहे. सामाजिक कार्यातही उमेशचा सक्रिय सहभाग होता. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

Ch. Sambhajinagar Live : बांग्लादेशातील हत्येच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरात निदर्शने

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज क्रांती चौकामध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या युवकाच्या हत्याच्या निषेधार्थ आज भाजपा, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात मंत्री अतुल सावे यांच्यासह प्रमुख नेते, संघटनांचे पदाधिकारी होते. यावेळी बांगलादेशाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

Pune Live : आयुष कोमकरच्या आईचे सुभाष जगतापांविरोधात पुणे पोलिसांना पत्र

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांच्या विरोधात केली तक्रार

सुभाष जगताप यांनी माध्यमांसमोर दिली होती आंदेकर कुटुंबातील दोन महिलांना क्लीनचीट

पोलीस तपासामध्ये छेडछाड व अफवा पसरवल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा

कल्याणी कोमकर यांनी पोलिसांना पत्र लिहून केली मागणी

Mumbai News : दोन ठाकरे एकत्र आले म्हणून भीती का? – संजय राऊत

ठाकरे बंधू एकत्र आले तर दबडी वाजवत कशाला, असा सवाल करत संजय राऊत यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. भाजपने मराठी माणसासाठी नेमकं काय केलं, असा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले की बावनकुळे वेगळ्या विदर्भाची भाषा करतात तेव्हा ठाकरे कुटुंब मराठी अस्मितेसाठी उभं राहत होतं, पण फडणवीसांना तेव्हा विचार करायची गरज वाटली नाही. बाळासाहेब ठाकरे होते म्हणूनच तुम्ही मुख्यमंत्री झालात, हे विसरू नका, असा टोला त्यांनी लगावला. दोन ठाकरे एकत्र आले आहेत, आम्ही बघूच ना, असं म्हणत त्यांनी भाजपच्या टीकेला उत्तर दिलं आणि हे एकमेकांची मॉलिश करायला एकत्र आले आहेत का, असा सवालही उपस्थित केला. मराठी माणसांच्या संघटना तोडण्याचं काम भाजपनेच केलं आहे, असा आरोप करत राऊत यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली.

निवडणूक प्रमुख पदावरून आमदार किशोर जोरगेवार यांना हटवले

निवडणूक प्रमुख पदावरून आमदार किशोर जोरगेवार यांना हटवले

चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या जागी आता भाजपने माजी राज्यसभा खासदार अजय संचेती यांच्याकडे चंद्रपूर मनपाचे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिली. ही जबाबदारी आधी किशोर जोरगेवार यांना देण्यात आली होती. मात्र किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात सुरू असलेल्या पक्षांतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रदेश भाजपने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देताना पक्षपात होऊ नये, नेत्यांच्या गटबाजीचा फटका बसू नये, यासाठी पक्षाने बाहेरचा निवडणूक प्रमुख बनवला, असे सांगितले जाते. या निर्णयामुळे जोरगेवार यांना चांगला धक्का बसला आहे.

मुंबई महापालिकेत भाजप शिवसेना युती जवळपास निश्चित

मुंबई महापालिकेत भाजप शिवसेना युती जवळपास निश्चित

एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर अनेक बाबींवर एकमत झाल्याची माहिती

भाजप शिवसेना दोघेही एकत्र लढणार असल्याचं जवळपास निश्चित,

आज भाजप आणि शिवसेना दोघांची बैठक होणार

फरक पडणार नाही तर प्रतिक्रिया का देताय : संजय राऊत

फरक पडणार नाही तर प्रतिक्रिया का देताय : संजय राऊत

उद्धव ठाकरेंमुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले

एकमेकांना मालिश करण्यासाठी तुम्ही महायुती केली आहे.

खासदार संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर घाणाघात

भाजप शिंदेंची मुलं पळवणार आहे, शिंदेंनी स्वत:ची मुलं सांभाळावी

Solapur News : गर्भलिंग निदानानंतर असुरक्षित गर्भपातामुळे महिलेचा मृत्यू

सोलापुरातल्या बार्शीत अवैध गर्भलिंग निदान चाचणीनंतर केलेल्या असुरक्षित गर्भपातामुळे २८ वर्षीय विवाहितेला आपला जीव गमावा लागल्याची धक्कादायक घटना घडलीय.बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.हा प्रकार 6 ते 14 डिसेंबर या कालावधीत घडला.वृषाली वैभव मोरे असे मयत झालेल्या 28 वर्षीय विवाहितेचे नाव आहे. 6 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे राहणारा आरोपी विकास पवार याने सोबतच्या एका महिलेच्या आणि पुरुषाच्या मदतीने वृषाली हिच्या पोटातील गर्भ मुलगा आहे की मुलगी हे तपासण्यासाठी सोनोग्राफी केली होती.

Solapur News :सोलापुरात मविआचा फॉर्म्युला ठरला? बैठकीत निर्णय झाल्याची शक्यता

सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, मनसे, माकप या महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरलाय यामध्ये काँग्रेस 50-55, उद्धव ठाकरे गट 27-29, शरद पवार गट 17-18, माकप 8-10 असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली सोलापुरात महाविकास आघाडीच्या जागा वाटप संदर्भात काल संध्याकाळी सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक पार पडली

Kolhapur politics : शिवसेना ठाकरे गटाला सात जागा निश्चित

कोल्हापूर : ‘महाविकास आघाडीत कॉंग्रेससोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती झाली आहे. शिवसेनेला सात जागा निश्चित केल्या आहेत. उर्वरित पाच जागांवर चर्चा सुरू आहे. एकूण १२ आणि एक स्वीकृत नगरसेवक शिवसेनेला देण्याबाबतचा प्रस्ताव आहे’, अशी माहिती महाविकास आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

Khed-Shivapur Toll Plaza : खेड-शिवापूर टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा, दीड किलो मीटरपर्यंत वाहतूक खोळंबली

खेड-शिवापूर टोलनाक्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या असून तब्बल दीड किलो मीटर पर्यंत वाहतूक खोळंबली आहे.

Kolhapur Politics : मंत्री मुश्रीफ, समरजितसिंह घाटगे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

कोल्हापूर : शाहू उद्योगसमूहाचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे उपस्थित होते.

Belgaum News : शिवारातून अधिकाऱ्यांना पिटाळले; शेतकऱ्यांचा संताप, काम करू न देण्याचा पवित्रा कायम

बेळगाव : हालगा-मच्छे बायपासविरोधात न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. तसेच शिवारात सर्वेक्षण करण्यास शेतकऱ्यांची संमती नाही, असे सांगत बुधवारी शहापूर शिवारात सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी पिटाळून लावले.

Revolver of Honor Award : कोल्हापूरच्या प्रियांकाने पटकावले 'रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर'सह पाच पुरस्कार

नाशिक : येथील महाराष्ट्र पोलिस अकादमी येथे काल प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांच्या १२६व्या तुकडीचे दीक्षांत संचलन झाले. ३८९ प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांनी पद व कर्तव्याची शपथ घेतली. जकनहट्टी (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथील प्रियांका पाटील हिने सर्वोच्च पारितोषिक ‘रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर’सह पाच पुरस्कार पटकावले.

Kolhapur Municipal Corporation Election : महायुतीचे ७० जागांवर एकमत; मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या उमेदवारीसंदर्भात काल पुणे येथे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यामध्ये सुमारे ६० ते ७० जागांवर एकमत झाले आहे. ९ ते १० जागांवर अद्याप मतभेद आहेत. या जागांच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे निर्णय घेतील, असे बैठकीत ठरवण्यात आले. या बैठकीला खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, अमल महाडिक हे उपस्थित होते.

Mumbai Municipal Corporation Election : मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र ताकद दाखवणार? स्वबळावर लढण्याचा निर्धार

Latest Marathi Live Updates 25 December 2025 : राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. हा पक्ष मुंबईतील ७० जागा लढवण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आता सर्वपक्षीयांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंमधील राजकीय युतीवर शिक्कामोर्तब झालेय. ‘एकला चलो रे’ची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसने महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षासोबत (रासप) आघाडी केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी परिवहन मंत्री आदिवासी सेवा साहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक सुरूपसिंग नाईक (वय ८८) यांचे काल (बुधवार) सकाळी निधन झाले. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.