जगभरात ख्रिसमस सेलिब्रेशन सुरू आहे. मात्र, यादरम्यानच अमेरिकेने मोठा हल्ला नायजेरियातील आयएसआयएसच्या ठिकाणांवर केला. या हवाई हल्ल्यांमुळे मोठी खळबळ उडाली. आपल्याच आदेशानंतर ही हल्ले करण्यात आल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. ख्रिश्चन लोकांची हत्या आयएसआयएस करत होते. आम्हाला त्यांना याबद्दल स्पष्ट शब्दात सांगितले होते की, तुम्ही हे करू नका, नाही तर अत्यंत वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल. शेवटी थेट हवाई हल्ले त्यांच्या ठिकाणांवर करण्यात आली. अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. आता अमेरिकेच्या हल्ल्यानंतर नायजेरिया सरकारवर यावर भाष्य केले. ऐन ख्रिसमसच्या दिवशी हा हल्ल्ा केल्याने सर्वांनाच धक्का बसला.
या हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, हे सहकार्य आंतरराष्ट्रीय नियम आणि द्विपक्षीय करारांनुसार होत आहे. गुप्तचर माहितीची देवाणघेवाण, सामरिक समन्वय आणि इतर आवश्यक समर्थनाचा समावेश आहे. सार्वभौमत्वाचा आदर राखून आणि प्रादेशिक व जागतिक सुरक्षेप्रती असलेल्या सामायिक वचनबद्धतेनुसार सुरू असल्याचे नायजेरियाच्या सरकारने आपल्या निवेदनात म्हटले.
नायजेरियन सरकारने म्हटले की, सर्व दहशतवादविरोधी प्रयत्नांचा प्राथमिक उद्देश हा नागरिकांची सुरक्षा आहे. राष्ट्रीय एकता टिकवणे आणि सर्व नागरिकांचे हक्क व सन्मान जपणे हा आहे. कोणत्याही समुदायाविरुद्धची दहशतवादी हिंसा ही नायजेरियन मूल्यांचा आणि आंतरराष्ट्रीय शांततेचा अपमान आहे, असेही त्यांनी आपल्या निवेदनात अगदी स्पष्टपणे म्हटले आहे. अमेरिकेने जी कारवाई नायजेरियातील आयएसआयएसच्या ठिकाणांवर केले, त्याला नायजेरियाच्या सरकारचा सपोर्ट असल्याचे यावरून स्पष्ट होताना दिसत आहे.
अमेरिेकेला नायजेरियाने या कारवाईसाठी मदत केली. रिपोर्टनुसार, अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचे अड्डे पूर्णपणे उद्धवस्थ झाली आहेत. ज्यावेळी हा हल्ल्या करण्यात आला, त्यावेळी अनेक दहशतवादी तिथे होते, असेही सांगितले जात आहे. अनेक दहशतावाद्यांचा खातमा या हल्ल्यात झाला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या हल्ल्याबद्दलची माहिती दिली आहे. मीच हल्ल्याचे आदेश दिल्याचेही त्यांनी म्हटले.