INDW vs SLW : टीम इंडियाचा तिसऱ्या टी 20I सामन्यात फिल्डिंगचा निर्णय, प्लेइंग ईलेव्हनमधून दोघांचा पत्ता कट
GH News December 26, 2025 10:11 PM

वूमन्स टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या सामन्याचं आयोजन हे तिरुवनंतरपुरममधील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस करण्यात आला. पुन्हा एकदा टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा (India Women vs Sri Lanka Women 3rd T20i Toss) कौल लागला. कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हीने फिल्डिंगचा निर्णय घेत पाहुण्या श्रीलंकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला पहिल्या दोन्ही सामन्यात 130 धावांच्या आतच रोखलं होतं. त्यामुळे आता महिला ब्रिगेडमधील गोलंदाज तिसऱ्या सामन्यात कशी कामगिरी करतात? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

दोन्ही संघात बदल

टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. नंबर 1 ऑलराउंडर दीप्ती शर्मा (Deepti Sharma) हीचं कमबॅक झालं आहे. दीप्तीने तिला बरं वाटत नसल्याने दुसऱ्या सामन्यातून माघार घेतली होती. मात्र आता दीप्तीचं कमबॅक झाल्याने स्नेह राणा हीला बाहेर बसावं लागलं आहे. त्याशिवाय रेणुका सिंह हीचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे अरुंधती रेड्डी हीला बाहेर करण्यात आलं आहे. तर श्रीलंकेने तब्बल प्लेइंग ईलेव्हनमध्ये 3 बदल केले आहेत.

टीम इंडियाचं मिशन सीरिज, श्रीलंकेसाठी करो या मरो

दरम्यान टीम इंडिया या मालिकेत 2-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे. टीम इंडियाने सलग 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे महिला ब्रिगेडला सलग तिसरा सामना जिंकून मालिका नावावर करण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंका मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. श्रीलंका या करो या मरो सामन्यात टीम इंडियासमोर कशी कामगिरी करते? हे सामन्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

भारताचा फिल्डिंगचा निर्णय

वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कॅप्टन), रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, रेणुका सिंग ठाकूर आणि श्री चरणी.

श्रीलंका वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : चमारी अट्टापट्टू(कॅप्टन), हसिनी परेरा, हर्षिता समरविक्रमा, निमेशा मधुशानी, कविशा दिलहरी, निलाक्षीका सिल्वा, इमेशा दुलानी, कौशली नुथ्यांगना (विकेटकीपर), मलशा शेहानी, इनोका रणवीरा आणि मलकी मदारा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.