कोल्हापूर : राजकीयदृष्ट्या संवेदनशील, मध्यवस्तीतील हा प्रभाग. जुन्या पेठा, तालमींबरोबरच काही प्रमाणात उपनगरांचा भाग असलेल्या तसेच उत्तर, दक्षिण विधानसभा मतदारसंघांत विभागलेल्या प्रभागातील अनेक इच्छुकांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे.
माजी उपमहापौर, स्थायी सभापती, नगरसेवकांबरोबरच अनेक सामाजिक कार्यकर्ते, तरुण कार्यकर्त्यांनी शड्डू ठोकला आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी असली तरी विजय खेचण्यासाठी मतांची गोळाबेरीज आवश्यक आहे. त्यासाठी भागनिहाय ताकदवान उमेदवार देण्याचे आव्हान पक्षांसमोर आहे, तर उमेदवारी मिळवायचीच याचा आटापिटा जोरात सुरू आहे. या प्रयत्नांमुळे बंडखोरीची दाट शक्यता आहे. - उदयसिंग पाटील
Kolhapur Election : राजेश क्षीरसागरांचा होमपिच तापला; जुन्या पेठांपासून बाजारपेठांपर्यंत इच्छुकांची प्रचंड गर्दीमंगळवार पेठ, शिवाजी पेठेबरोबर छत्रपती संभाजीनगर, टिंबर मार्केट, वारे वसाहत, गंजीमाळ असा भाग असलेल्या प्रभागात २०१५ मधील कैलासगडची स्वारी, सिद्धाळा गार्डन, नाथागोळे तालीम, वारे वसाहत अशा प्रभागांचा प्रामुख्याने समावेश आहे. शेजारच्या काही प्रभागांतील भागही जोडले आहेत.
गेल्यावेळी आरक्षणामुळे संधी न मिळालेले माजी नगरसेवकही आहेत. माजी पदाधिकारी, नगरसेवकांनी जुन्या संपर्काच्या जोरावर रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. मंगळवार पेठ, संभाजीनगर परिसरातून मोठ्या संख्येने इच्छुक आहेत. त्यातून सर्व प्रभागांतील मतदान मिळवण्याच्या दृष्टीने विविध पक्षांनी प्रयत्न चालवला आहे.
Kolhapur Election : राजेश क्षीरसागरांचा होमपिच तापला; जुन्या पेठांपासून बाजारपेठांपर्यंत इच्छुकांची प्रचंड गर्दीजुन्या प्रभागातील काहींनी महापालिका, तसेच विविध सामाजिक कार्यातून शेजारच्या प्रभागातूनही तयारी केली होती. त्याशिवाय इतर भागांतून त्यांना कशी मदत होणार यावर त्यांची लढत चुरशीची की नाममात्र होणार हे ठरणार आहे. दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघात विभागल्या गेलेल्या या प्रभागातील प्रश्नही वेगवेगळे आहेत.
झोपडपट्टी, कामगार चाळ, टिंबर व्यावसायिक, पेठांमधील वस्ती, तसेच मध्यमवर्गीयांची वस्ती असलेल्या प्रभागात केवळ एका भागातील संपर्क चालणार नाही. तसेच मंगळवार पेठ, शिवाजी पेठ हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यात समतोल राखण्याचे काम उमेदवारी देताना केले जाणार आहे. फुटबॉलचा विषयही या प्रभागात मोठ्या जिव्हाळ्याचा विषय ठरणार आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या फॅक्टरवर बऱ्याच मोठ्या उलाढाली झाल्या.
प्रभागाची व्याप्तीअहिल्याबाई होळकर शाळा, पिनाक व्यंकटेश अपार्टमेंट, स्वयंवर मंगल कार्यालय, सुबराव गवळी तालीम, चौंडेश्वरी हॉल, महादेव मंदिर, चौंडेश्वरी मंदिर पूर्व भाग, योगेश्वरी अपार्टमेंट, सिद्धाळा गार्डन, कोळेकर तिकटी, गुलाब गल्ली, हैदर रोड, बजापराव माने तालीम, नाथागोळे तालीम, टिंबर मार्केट, वारे वसाहत, मगदूम कॉलनी, संभाजीनगर परिसर
दृष्टिक्षेपात लोकसंख्याएकूण लोकसंख्या = २७,६२६
अनुसूचित जाती लोकसंख्या = ४१०३
अनुसूचित जमाती लोकसंख्या = ५५
पुरुष मतदार = १२७८५
महिला मतदार = १३३१२
एकूण मतदार = २६१०१
आरक्षण असेअ- अनुसूचित जाती महिला
ब- नागरिकांचा मागासवर्ग महिला
क- सर्वसाधारण
ड- सर्वसाधारण
इच्छुक असे....संभाजी देवणे, सचिन चव्हाण, संभाजी जाधव, जयश्री चव्हाण, किरण नकाते, रवींद्र आवळे, रामदास भाले, माधुरी नकाते, यशोदा मोहिते, प्रसाद जाधव, संदीप सरनाईक, आशीष पोवार, उमेश पोवार, सचिन पोवार, वीरेंद्र मोहिते, किशोर यादव, अमृता भाले, रोहित भाले, विजय आगरवाल, गणेश देसाई, युवराज साळोखे, बंडा लोंढे, कोमल लोंढे, सचिन आडसूळ, राणी गायकवाड, संतोष माळी, कुणाल शिंदे, मदन चोडणकर, वीरेंप्रसाद जाधव, रिची फर्नांडिस, अभिषेक देवणे, पायल कुरडे, योगिता माने, रमा पचेरवाल, पवित्रा रांगणेकर, सचिन मांगले, रत्नदीप हवालदार, बाळासाहेब भोसले, दीपाली पवार, निलांबरी साळोखे, अलका जावीर, ज्योतिरादित्य सावंत.
विकासाचे मुद्देपार्किंगच्या जागांसाठी नियोजन हवे
अंतर्गत रस्ते डांबरीकरणाला वाव
कचरा संकलनासाठी शिस्त आवश्यक
रिकाम्या जागा विकसित करण्याची संधी
गटारी, ड्रेनेज लाईनची आवश्यकता
पाणीपुरवठ्याच्या समस्येवर उपाय