Cheapest Beer: केवळ 18 रुपयांमध्ये बिअर, या देशात पाण्यापेक्षा स्वस्तात मिळतेय दारू
Tv9 Marathi December 28, 2025 10:45 PM

Cheapest Alcohol: जगभरात मद्यप्रेमींची काही कमी नाही. त्यामुळेच भारतातच नाही तर अनेक देशात जागोजागी दारुची दुकानं दिसतात. अनेक देशात कर प्रणालीमुळे आणि सरकारच्या उत्पन्नाचा मोठा स्त्रोत असल्याने दारू महागडी मिळते. पण जगातील काही असे देश आहेत जिथे दारूची किंमत अत्यंत कमी आहे. येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी स्वस्तात दारु देण्यात येते. जगातील या देशात तर पाण्याच्या बॉटलपेक्षा दारु स्वस्तात मिळते. त्यामुळे अनेक जण या देशाला भेट देण्यासाठी उत्सुक असतात. पर्यटनासोबत या देशात मद्यमहोत्सवात हे लोक चील्ड होतात. या देशात स्वस्तात दारू मिळत असल्याने त्याची मद्यप्रेमींमध्ये मोठी चर्चा होते. कोणता आहे हा देश?

भारतात कुठे मिळते स्वस्तात दारु?

भारतात स्वस्तात दारु कुठे मिळते याचे उत्तर जवळपास सर्वच मद्यपींना माहिती आहे. तर हे राज्य म्हणजे गोवा आहे. गोव्यात त्यामुळेच पर्यटक झुंडीने जातात आणि दारु रिचवतात. भारतातील सर्वात स्वस्त बिअर आणि दारु ही गोव्यात मिळते. येथील लोकल बिअरचा पण त्यात समावेश आहे. भारतातील अनेक राज्यापेक्षा गोव्यात दारु अत्यंत स्वस्त मिळते. त्यामुळे गोव्यात पार्टीचे आयोजन करणाऱ्यांची कमी नाही. पर्यटनासोबत ते मौजमजा पण करतात. त्यामुळे अनेक पर्यटक या स्वस्ताईचा फायदा घेतात.

कुठे मिळते स्वस्तात बिअर?

जगातील सर्वात स्वस्त बिअर ही व्हिएतनाम या देशात मिळते. येथे बिअरला बिया होई असं म्हणतात. या बिअरचा भाव इतका कमी आहे की अनेकांना त्यावर विश्वास बसत नाही. बिया होईचा एक ग्लास तुम्हाला केवळ 5 हजार व्हिएतनामी डोंग म्हणजे केवळ 18 रुपयांना मिळेल. याच देशातील काही गजबजलेल्या भागात हा भाव 20 ते 25 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. तर येथे पाण्याची एक बाटली जवळपास 30 हजार डोंग इतकी आहे. म्हणजे भारतीय चलनात इथे जवळपास 100 रुपयांना सीलबंद पाण्याची बॉटल मिळते.

का मिळते इतकी स्वस्तात बिअर?

व्हिएतनामची बिअर ही स्थानिक लोकच तयार करतात. ही बिया होई कॅन अथवा बॉटलमध्ये मिळत नाही. तर एका मोठ्या पिंपात मिळते. फ्रेश बिअर तयार करुन लागलीच विक्री होते. त्यामुळे ही बिअर स्वस्त मिळते. या बिअरमुळे स्थानिक लोकांना मोठा फायदा मिळतो. त्यांना रोजगार मिळतो. येथे दारु विक्रीतून इतर उद्योगांनाही चालना मिळते. इतर खाद्य व्यवसाय, पर्यटन, हॉटेलिंगपासून अनेकांना चांगली कमाई होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.