वूमन्स टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या टी 20i सामन्यात 30 धावांनी विजय मिळवला. भारताने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 4-0 ने आघाडी मिळवली. ओपनर स्मृती मंधाना, शफाली वर्मा आणि ऋचा घोष या तिघींनी भारताच्या या विजयात बॅटिंगने प्रमुख योगदान दिलं. या तिघींनी तोडफोड खेळी करत भारताला 221 धावांपर्यंत पोहचवलं. यासह स्मृती, शफाली आणि ऋचा या तिघांच्या नावावर खास रेकॉर्ड झाला आहे.